FIFA World Cup 2026 | इजिप्‍तने जिंकला पेनल्टी शूटआऊटचा थरार 
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 | इजिप्‍तने जिंकला पेनल्टी शूटआऊटचा थरार

पुढारी वृत्तसेवा

डॅलस; वृत्तसंस्‍था : अगदी पेनल्‍टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्‍या रोमांचक लढतीत इजिप्तने ऑस्ट्रेलियाचा संघर्ष अखेर ४-२ असा मोडीत काढला आणि या विजयासह ‘राऊंड ऑफ १६’ (उपउपांत्यपूर्व फेरी) मध्ये प्रवेश केला. डॅलस येथील या सामन्यात निर्धारित ९० मिनिटे आणि त्यानंतरची अतिरिक्त वेळ संपली, तरी दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्‍ये इजिप्तने ऑस्ट्रेलियाचे पॅकअप केले. आता पुढच्या फेरीत इजिप्तचा सामना बलाढ्य अर्जेंटिनाशी होणार आहे.

पूर्वार्धात इजिप्तने पूर्ण नियंत्रण ठेवले. सुरुवातीच्या टप्प्यातच इमाम अशुअरने अप्रतिम हेडर करत गोल केला आणि इजिप्तला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. पुनरागमन करण्यासाठी धडपडणाऱ्या ऑस्ट्रेलियाला इजिप्तच्या मोहम्मद हानीच्या एका चुकीमुळे बरोबरी साधता आली. हॅनीच्या डोक्याला लागून चेंडू त्यांच्याच गोलपोस्टमध्ये गेला आणि ऑस्ट्रेलियाला १-१ अशी बरोबरी मिळाली. यामुळे या लढतीत पेनल्‍टी शूटआऊटचा अवलंब करण्‍यात आला. त्‍यात इजिप्‍तने ४-२ अशी बाजी मारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT