दुलीप ट्रॉफीला गुरुवारपासून सुरुवात झाली. युवा फलंदाज मुशीर खानने इंडिया-बीकडून खेळताना उत्कृष्ट शतक झळकावले.  Twitter
स्पोर्ट्स

मुशीर खानचे पदार्पणाच्या सामन्यात शतक, भारत-बी संघासाठी बनला संकटमोचक

Duleep Trophy : मुशीर-नवदीपची 8व्या विकेटसाठी शतकी भागीदारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Duleep Trophy Musheer Khan Century : दुलीप ट्रॉफीला गुरुवारपासून सुरुवात झाली. पहिल्या फेरीच्या सामन्यांच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांची दांडी गुल केली. मात्र गोलंदाजांच्या झंझावातामध्ये युवा फलंदाज मुशीर खानने इंडिया-बीकडून खेळताना उत्कृष्ट शतक झळकावले.

इंडिया-ए च्या गोलंदाजांनी इंडिया बी च्या ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल आणि मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खान यांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ज्यामुळे इंडिया बी अडणीत सापडली. त्यानंतर 19 वर्षीय मुशीरने एकाबाजूने चिवट फलंदाजी केली आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत आणले. विशेष म्हणजे मुशीरचा हा दुलीप ट्रॉफीमधला पहिलाच सामना आहे आणि त्याने याच सामन्यात हे शतक झळकावले.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीरने 19 वर्षीय मुशीरने पहिला 118 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आणि त्यानंतर 204 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीमुळे 94 धावांत 7 विकेट्स गमावलेल्या इंडिया बी संघ कठीण परिस्थितीतून सावरला. मुशीरने नवदीप सैनीसोबत आठव्या विकेटसाठी 187 चेंडूत शतकी भागीदारीही केली. यामध्ये मुशीरने 76 आणि सैनीने 25 धावांचे योगदान दिले. मुशीरने आपल्या शतकी खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार मारले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुशीर खान नाबाद 105 आणि नवदीप सैनी नाबाद 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यावेळी भारत ब संघाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 202 धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT