FIFA World Cup Final Trump: फिफा वर्ल्डकपची फायनल एका मोठ्या ड्रामेबाजीनं संपली आहे. न्यूयॉर्कच्या न्यू जर्सी स्टेडियममध्ये स्पेनने गजविजेत्या अर्जेंटिनाचा १ - ० ने पराभव केल्यानंतर वर्ल्डकप ट्रॉफी सेरेमनी पार पडला. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध न्यूजर्सी स्टेडियममध्ये गुटिंग झालं. त्याचबरोबर ट्रम्प मैदानावर आले त्यावेळी त्यांचे निराशाजनक आवाजात स्वागत करण्यात आलं.
ज्यावेळी नव्या विश्वविजेत्या स्पेनला ट्रॉफी देण्यात आली त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि फिफाचे प्रमुख जियानी इन्फेंटिनो यांनी खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी स्टेजवर जाऊ लागले. त्यावेळी स्टेडियममधील प्रेक्षकांनी हूटिंग सुरू केलं. मात्र हे हूटिंग फार काळ चाललं नाही.
ज्यावेळी राष्ट्रपती ट्रम्प आणि इन्फेंटिनो यांनी खेळाडूंना मेडल द्यायला सुरूवात केली त्यावेळी हे हूटिंग संपलं होतं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इन्फेंटिनो यांनी विजेत्या संघाला वर्ल्डकप ट्रॉफी सोपवलं.
हा ऐतिहासिक अंतिम सामना पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे हेलिकॉप्टरने स्टेडियमवर पोहचले होते. त्यानंतर ज्यावेळी स्पेनला त्यांनी ट्रॉफी सोपवली त्यावेळी ते पोडियमवर तिथंच उभे राहिले होते. मात्र ज्यावेळी स्पेनचा कर्णधार रोड्री फोटोग्राफर्स आणि कॅमेऱ्यासमोर वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावणार होते त्यावेळी फिफा प्रमुख ट्रम्प यांना स्टेजवर एका कोपऱ्यात घेऊन गेले.
ग्रुप स्टेजमध्ये अमेरिकेचा सामना बोस्निया विरूद्ध होता. या सामन्यात अमेरिकेचा स्ट्रायकर फोलारिन बोलोगुनला रेफ्रीने रेड कार्ड दाखवलं होतं. या निर्णयाविरूद्ध नाराज झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट फिफा प्रमुख जियानी इन्फेंटिनो यांना कॉल केला होता. त्यांनी या निर्णयाबाबत पुर्नविचार व्हावा अशी मागणी केली होती.
कोणताही राष्ट्राध्यक्ष खेळाच्या नियमात आणि निर्णयात थेट दखल देत नाही. मात्र ट्रम्प यांच्याकडून असा प्रयत्न झाल्यानं जाणकारांनी नाराजी व्यक्त केली होती. या वादाची किनार फायनलच्या बक्षीस सोहळ्याला देखील लाभली. त्यामुळंच फुटबॉल चाहत्यांनी ट्रम्प मैदानावर आले त्यावेळी हूटिंग करून त्यांचे स्वागत केलं.