दिनेश कार्तिकचे IPL मध्ये पुनरागमन file photo
स्पोर्ट्स

दिनेश कार्तिक IPL मध्ये परतला, 'या' नव्या भूमिकेत दिसणार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने १ जून रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) सह क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली होती. पण अवघ्या ३० दिवसांनंतर कार्तिकवर आयपीएलमध्ये मोठी जबाबदारी आली आहे. दिनेश कार्तिकची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबतची माहिती आरसीबीने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

कार्तिकने त्याच्या ३९ व्या वाढदिवसादिवशी (१ जून) निवृत्तीची घोषणा केली होती. नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात कार्तिक आरसीबीकडून खेळला होता. फ्रेंचायझीने आज (दि.१) सोशल मीडिया पोस्टमध्ये कार्तिकचा 'नवा अवतार' घोषित केला. आरसीबीने ट्विटरवर कार्तिकचा व्हिडिओ पोस्ट केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आरसीबीमध्ये आमचे यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचे पूर्णपणे नवीन अवतारात स्वागत आहे. डीके आरसीबी पुरुष संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असतील."

अशी आहे कार्तिकची आयपीएल कारकीर्द

दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये २५७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २६.३२ च्या सरासरीने ४,८४२ धावा केल्या आहेत. आरसीबी व्यतिरिक्त कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडूनही खेळला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT