इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठी ( Digvesh rathi ) याला मैदानात वारंवार शिस्तभंग करणे चांगलेच भोवले आहे. त्याच्या वर्तनाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गंभीर दखल घेतली आहे. बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली असून, आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिषेक शर्मा (Abhishek sharma) वरही कारवाई झाली आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या संघातील सामना एकाना स्टेडियमवर झाला. दिग्वेश राठीने स्वतःच्या चेंडूवर अभिषेक शर्माला झेलबाद केले. त्यानंतर तिने तिच्या खास शैलीत नोटबुक सेलिब्रेशन केले. तसेच त्याने अभिषेकला मैदानावरुन निघून जाण्याचा इशाराही केला. अभिषेक संतापला. तो पॅव्हेलियनमध्ये परतताना दिग्वेशकडे गेला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दोघेही हमरी-तुमरीवर आले. त्याच वेळी, दंड ठोठावण्यात आला असूनही दिग्वेश राठीने उत्सव साजरा करण्याची आपली पद्धत सोडली नाही.
आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआयने राठीला शिक्षा केली आहे. याशिवाय, त्याला त्याच्या सामना शुल्काच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात दिग्वेश राठीने कलम २.५ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा करण्याची ही तिसरी वेळ आहे. यामुळे त्याला पाच डिमेरिट पॉइंट्स मिळाले आहेत. १ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याला पहिल्यांदाच डिमेरिट पॉइंट मिळाले. त्यानंतर ४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याला दोन डिमेरिट पॉइंट मिळाले. आता त्याला SRH विरुद्धच्या सामन्यात पुन्हा दोन डिमेरिट पॉइंट मिळाले आहेत.
नोटबुक सेलिब्रेशनमुळे राठी याच्यावर कारवाई करण्यात आली. आता लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध, राठीने केवळ नोटबुक सेलिब्रेशनची पुनरावृत्ती केली नाही तर अभिषेक शर्माला बाहेर जाण्याचा इशाराही दिला. बीसीसीआयने निर्णय घेतला होता की ते यापुढे कोणतीही उदारता दाखवणार नाही. म्हणून त्याने राठीवर एका सामन्याची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे, राठी यापुढे २२ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही.