स्पोर्ट्स

मॅराडोनांचे ‘हँड ऑफ गॉड’ काय आहे प्रकरण?

Pudhari News

 पुढारी ऑनलाईन डेस्क 

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ६० वर्षाच्या या दिग्गज फुटबॉलपटूच्या निधनाने अख्खे फुटबॉल विश्व हळहळले. मॅराडोनांच्या जाण्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जुण्या आठवणींना उजळा दिला. डाव्या पायाने नजाकतदार गोल मारण्यात मास्टरी मिळवलेल्या मॅराडोना यांचे अनेक गोल अप्रतिम आहेत. पण, त्यांच्या या डाव्या पायाने मारलेल्या अप्रतिम गोलपेक्षा त्यांच्या एका ऐतिहासिक हेडचीच चर्चा जास्त झाली. त्यांनी हा हेड १९८६ च्या विश्वचषकात मारला होता. हाच ऐतिहासिक विश्वचषक मॅराडोना यांनी अर्जेंटिनाला जिंकून दिला होता. 

१९८६ च्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडचा २ – १ असा पराभव केला होता.  मॅराडोनाने ५१ व्या मिनिटाला मारलेल्या वादग्रस्त हेडची फुटबॉल इतिहासात  हँड ऑफ गॉड अशी नोंद झाली आहे. सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या फॉरवर्ड्सनी इंग्लंडच्या गोलपोस्टवर जोरदार चढाई केली. या चढाईत मॅराडोना आघाडीवर होता. त्याने दोन इंग्लंडच्या तीन डिफेंडरना चकवा देत उजव्या बाजूच्या फॉरवर्डकडे पास दिला. त्यानंतर मॅराडोनाने गोलपोस्टजवळ स्वतःसाठी जागा निर्माण केली. त्या उजव्या बाजूला असलेल्या फॉरवर्डने मॅराडोनाच्या दिशेने लॉफ्टेड शॉट टाकला. या पासवर मॅराडोनाने हेड मारण्यासाठी हवेच उंच उडी मारली पण, उडी मारताना त्याचा हात अनावधानाने डोक्याच्या वर गेला. त्यामुळे चेंडू पहिल्यांदा त्याच्या हाताला आणि त्यानंतर डोक्याला लागून गोलपोस्टमध्ये गेला. 

रेफरीने हा अवैध गोल वैध ठरवला त्यामुळे इंग्लंडचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. या गोलनंतर मॅराडोनाने म्हणाला होता की 'हा गोल थोडा मॅराडोनाच्या डोक्याने आणि थोडा देवाने लावलेल्या 'हात'भारामुळे झाला.' अशी प्रांजळ कबुली दिली होती. त्यानंतर मॅराडोनाचा हा इंग्लंड विरुद्धचा गोल फुटबॉल इतिहासात 'हँड ऑफ गॉड' या नावाने प्रसिद्ध झाला. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT