स्पोर्ट्स

आयपीएलमध्ये तडाखेबंद खेळीने धवनची वर्ल्डकप संघात दावेदारी

Arun Patil

मुंबई, वृत्तसंस्था : भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमधून बीसीसीआय आपल्या आगामी मालिकांसाठी खेळाडूंचा शोध घेत असते. सध्या सर्वच संघ वन डे वर्ल्डकपच्या तयारीत गुंतले आहेत. भारतीय संघात सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची सलामी जोडी फिट झाली असली तरी त्यांच्या बॅकअपसाठी शिखर धवन संघात येऊ शकतो.

आयपीएल 2023 मध्ये सध्या शिखर धवन फलंदाज आपल्या बॅटने कहर करतो आहे. या फलंदाजाच्या वेगवान फलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आपल्या धुवाँधार बॅटिंगने या फलंदाजाने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये निवडीसाठी आपला मार्ग तयार केला आहे. विश्वचषक 2023 मध्ये हा फलंदाज कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा जोडीदारही बनू शकतो. विश्वचषक 2023 मध्ये प्रतिस्पर्ध्यांना एकहाती उद्ध्वस्त करण्यासाठी हा खेळाडू सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा हा खतरनाक खेळाडू विश्वचषक 2023 मध्ये प्रतिस्पर्धी संघांसाठी सर्वात मोठा शत्रू ठरणार आहे.

आयपीएल 2023 मध्ये शिखर धवनच्या बॅटमधून खोर्‍याने धावा निघत आहेत. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये शिखर धवनने 40 धावा, नाबाद 86 आणि नाबाद 99 धावा केल्या आहेत. शिखर धवनने 3 सामन्यांत एकूण 255 धावा केल्या आहेत आणि सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅप देखील होती. शिखर धवनने त्याच्या सर्वोत्तम फॉर्मसह 2023 च्या विश्वचषकात निवडीसाठी दावा केला आहे. 'गब्बर' म्हणून ओळखला जाणारा भारताचा झंझावाती सलामीवीर शिखर धवन जेव्हा क्रीजवर फलंदाजीसाठी येतो तेव्हा त्याने आपल्या झंझावाती खेळीने प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडतो.

SCROLL FOR NEXT