पुढारी ऑनलाईन डेस्क : आसामचे माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) सचिवपदी (BCCI secretary) नियुक्ती करण्यात आली आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रमुखपदी जय शहा यांची नियुक्ती झाली आहे.
देवजित सैकिया हे मूळचे आसामचे आहेत. माजी क्रिकेटपटू असणारे सैकिया यांचा कायदा आणि प्रशासनही अनुभव आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटू म्हणून सैकिया यांनी १९९० ते १९९१ दरम्यान चार सामने खेळले. ते यष्टीरक्षक होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. वयाच्या २८ व्या वर्षापासून गुवाहाटी उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करु लागले. त्यापूर्वी त्यांनी रेल्वे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्येही नोकरी केली होती. २०१६ मध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा यांच्या अध्यक्षतेखाली आसाम क्रिकेट असोसिएशन (एसीए) च्या सहा उपाध्यक्षांपैकी सैकिया एक होते. २०१९ मध्ये ते आसाम क्रिकेट परिषदेचे सचिव झाले.