DC vs RR | प्ले-ऑफच्या शर्यतीत आणखी एक ट्विस्ट! दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थानला ‘दे धक्का’ 
स्पोर्ट्स

DC vs RR | प्ले-ऑफच्या शर्यतीत आणखी एक ट्विस्ट! दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थानला ‘दे धक्का’

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अक्षर पटेल व इम्पॅक्ट प्लेयर आशुतोश यांच्या उत्तरार्धातील फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने राजस्थान रॉयल्सला ‘दे धक्का’ देत प्ले-ऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट आणला. राजस्थानने प्रारंभी 8 बाद 193 धावांची आतषबाजी केल्यानंतर दिल्लीने 19.2 षटकांत 5 बाद 197 धावांसह दणकेबाज विजय मिळवला. विजयासाठी 194 धावांचे तगडे आव्हान असताना अभिषेक पोरेल 51 व के. एल. राहुल 56 यांनी विजयाची भक्कम पायाभरणी केली, तर अक्षर (18 चेंडूंत नाबाद 34) व आशुतोष शर्मा (5 चेंडूंत नाबाद 18) यांनी त्यावर कळस चढवला.

प्रारंभी, डावखुर्‍या मिचेल स्टार्कच्या भेदक मार्‍याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 8 बाद 193 धावांवर रोखले. स्टार्कने (4/40) डावातील 15 व्या षटकात राजस्थानच्या डावाला खिंडार पाडले. त्याने रियान पराग (51), डोनोव्हन फरेरा (0) आणि रवी सिंग (4) यांना बाद करत सामन्याला कलाटणी दिली. या षटकातील दुसर्‍या, तिसर्‍या आणि पाचव्या चेंडूवर गडी बाद करत स्टार्कने राजस्थानला बॅकफूटवर ढकलले. या पडझडीनंतरही राजस्थान रॉयल्सने सन्मानजनक धावसंख्या उभारली होती.

प्ले-ऑफच्या 3 जागांसाठी तब्बल 7 दावेदार

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये आरसीबीने 18 गुणांसह प्ले-ऑफमधील स्थान निश्चित केले असून, उर्वरित 3 जागांसाठी गुजरात, हैदराबाद, पंजाब, चेन्नई, राजस्थान, दिल्ली व केकेआर असे 7 दावेदार अद्याप शर्यतीत कायम आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT