IPL Cricketer Receives Threat Calls
लखनऊ: भारतीय क्रिकेटपटू विप्राज निगम याला आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून वारंवार धमकीचे फोन आल्या प्रकरणी आल्यानंतर उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगमने तक्रारी म्हटलं आहे की, गेली दोन महिन्यांहून अधिक काळ अनेक आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून वारंवार धमकीचे कॉल येत आहेत.
विप्राज निगम याने तक्रारीत म्हटलं आहे की, सप्टेंबर २०२५ पासून ऋचा पुरोहित नावाने एका महिलेकडून धमकीचे कॉल आणि शिवीगाळ करणारे संदेश येत आहेत. सुरुवातीला एकाच मोबाईल क्रमांकावरून कॉल येत होते, पण तो क्रमांक ब्लॉक केल्यानंतर त्याच व्यक्तीने छळ चालू ठेवण्यासाठी कथितपणे अनेक परदेशी क्रमांकांचा वापर सुरू केला. तिच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर ती महिला त्याला खोट्या गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देत आहे. तसेच, तिने त्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बनावट व्हिडिओंसह खोटा मजकूर पसरवल्याचा आरोपही निगमने केला आहे.
निगमने दावा केला आहे की, त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनाही धमक्या देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्याला मानसिक त्रास आणि भीती वाटत आहे. बाराबंकी पोलिसांनी आता आंतरराष्ट्रीय कॉल्सचा उगम शोधण्यासाठी आणि क्रिकेटपटू विप्राज निगमने केलेल्या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी तपास सुरू केला आहे.आयपीएल २०२५ (IPL 2025) साठी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निगमला ५० लाख रुपयांना खरेदी केले होते आणि त्याने विझाग येथे लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.