Carlos Alcaraz Wimbledon final
गतविजेता कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली Twitter
स्पोर्ट्स

Wimbledon 2024 : अल्काराझची सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक, मेदवेदेवचा पराभव

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Wimbledon 2024 : गतविजेता कार्लोस अल्काराझने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. लंडनच्या सेंटर कोर्टवर शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत त्याने 28 वर्षीय मेदवेदेवचा 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. हा सामना सुमारे 3 तास चालला.

जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असणा-या अल्काराझची सुरुवात खराब झाली. मेदवेदेवने पहिला सेट ट्रायब्रेकरवर 6-7(1) ने जिंकला. पिछाडीवर पडलेल्या अल्काराझने हार मानली नाही आणि पुढच्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. हा सेट त्याने 6-3 ने खिशात टाकला. यानंतर अल्काराझने 6-4, 6-4 अशा फरकाने सलग दोन सेट आपल्या नावावर केले आणि सामन्यात विजय मिळवून सलग दुस-यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. रविवारी (14 जुलै) होणाऱ्या अंतिम फेरीत अल्काराझचा सामना नोव्हाक जोकोविच आणि लोरेन्झो मुसेट्टी यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.

SCROLL FOR NEXT