कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कडाक्याच्या थंडीसह धुके, शिस्तबद्ध पोलिस बँड, रस्त्याच्या दुतर्फा उभारलेले रंगीबेरंगी ध्वज, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि क्रीडाप्रेमींकडून मिळणारे भरघोस पाठबळ अशा उत्साही वातावरणात रौप्य महोत्सवी शाहू मॅरेथॉन उत्साहात झाली. रविवारी म्हणजेच 02- 02- 2020 या अविस्मरणीय तारखेदिवशी झालेल्या मॅरेथॉनमुळे क्रीडानगरीचा आनंद द्विगुणीत झाला. मॅरेथॉनच्या पुरुषांच्या खुल्या गटात 109 टी.ए. बटालियनचा जवान दीपक कुंभार याने प्रथम क्रमांकासह विजेतेपदाची परंपरा कायम राखली. तर महिलांच्या खुल्या गटात कोल्हापूरच्या प्रियांका शिंदे हिने अव्वल क्रमांक पटकाविला.
देशाचे भवितव्य असणारी भावी पिढी सक्षम व निर्व्यसनी राहावी त्यांच्या व्यायामाची आवड निर्माण होऊन ते सुदृढ व्हावेत आणि खेळ परंपरेचे जतन-संवर्धन आणि संरक्षण व्हावे, या उद्देशाने मंडळाने 1995 साली राजर्षी शाहूंच्या राज्यारोहण शताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉनची सुरुवात केली.
'समता-साक्षरता-क्रीडा विकास' या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीच्या विचारांचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने श्री बिनखांबी गणेश मित्र मंडळाच्या वतीने 'शाहूनगरी' कोल्हापूरची विशेष ओळख व अभिमान म्हणून 'शाहू मॅरेथॉन' प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
दिमाखदार उदघाटन सोहळा
'धावा सामाजिक बांधिलकीसाठी' असे आवाहन करणार्या यंदाच्या मॅरेथॉनचे ब—ीद "शाहू मॅरेथॉनचा ध्यास, शाहू मिलचा विकास' हे होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या मॅरेथॉनलाही भरघोस प्रतिसाद मिळाला. विविध 15 वयोगटातील सुमारे 5 हजार अबालवृध्द स्पर्धकांनी यात उत्सफूर्त सहभाग नोंदविला. रविवारी सकाळी 6 वाजता, बिनखांबी गणेश मंदीराजवळील राजर्षी शाहू मॅरेथॉन चौकातून या मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ झाला. आमदार चंद्रकांत जाधव व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी रौप्य महोत्स्वी शाहू मॅरेथॉनचे कार्याध्यक्ष तथा केएसस चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, उद्योजक तेज घाटगे, रविंद्र पाटील, अभय देशपांडे, जयेश कदम, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक अदिल फरास, डॉ. प्रकाश संघवी, अरुण अराध्ये आदी उपस्थित होते. दरम्यान मॅरेथॉनच्या दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट देवून खेळाडूं व संयोजकांना प्रोत्साहन दिले. पोलिस बॅण्डसह हलगीवादक संजय आवळे यांच्या हलगी पथकाने वातावरण निर्मीती केली.
सेलिब्रेटी रन…
रौप्य महोत्सवी शाहू मॅरेथॉनच्यानिमीत्ताने सेलिब—ेटी रनचे आयोजन करण्यात आले होते. यात सामाजिक, राजकिय, शासकिय, शैक्षणिक, उद्योग-व्यापार यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्सफूर्त सहभाग घेतला. यात आ. चंद्रकांत जाधव, जि.प. सीईओ डॉ. अमन मित्तल, माजी आ. मालोजीराजे, उद्योजक तेज घाटगे, जयेश कदम, महेश जाधव, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, डॉ. प्रकाश संघवी, लेखक शरद तांबट, ज्येष्ठ फुटबॉलपटू लालासाहेब गायकवाड, प्रकाश सरनाईक, धर्माजी सायनेकर, वैभव बेळगावकर याच्यासह सर्व आयर्न मॅन, कोल्हापूर जिल्हा बार. असो. पदाधिकारी, सी.ए. ग्रुपचे पदाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदींचा समावेश होता. कोल्हापूर सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव यांनी 'कोल्हापूर खंडपीठ झालेच पाहिजे' या मागणीचे स्टिकर लावून सहभाग नोंदविला.
बक्षीस वितरण अन सत्कार समारंभ…
बक्षीस समारंभ आमदार चंद्रकांत जाधव, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नंदकुमार सूर्यवंशी, समरजितसिंह मंडलिक, बाळासाहेब कडोलकर, डी.वाय.एस.पी. स्वाती गायकवाड, अॅथलेटिक्स असोसिएशनचे एस.व्ही. सूर्यवंशी, आर.बी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे दोन लाखांची बक्षीसे, प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. यानिमीत्ताने डॉ. प्रकाश संघवी, डॉ. अवधूत भोसले, विक्रमवीर सायकलपटू डॉ. केदार साळुंखे, व्याख्याते उदय मोरे, कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती जलतरणपटू अवनी धनंजय यादव, सुवर्णपदक विजेती धावपटू रिया पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मॅरेथॉनचा मार्ग व अंतर…
महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनच्या परवानगीने व कोल्हापूर जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या तांत्रीक मार्गदर्शनाखाली शाहू मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. पुरुष खुलागट, महिला खुला गट, शालेय 10, 12, 14, 17 मुले-मुली विविध वयोगट, 45 व 55 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अशा एकूण 15 गटात ही मॅरेथॉन रंगणार आहे. 21 कि.मी., 10 कि.मी., 6 व 5 कि.मी. बिनखांबी गणेश मंदीर- मिरजकर तिकटी-कोळेकर तिकटी – शाहू बँक चौक, नंगीवली चौक- संभाजीनगर- कळंबा- कात्यायणी- जैताळफाटा व याच मार्गावरून परत नंगीवली चौक- न्यू महाद्वारोड मार्गे राजर्षी शाहू मॅरेथॉन चौक असा मार्ग होता. मॅरेथॉनचे नेटके संयोजन कार्याध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, अध्यक्ष किसन भोसले, उपाध्यक्ष विनय भोसले, उपकार्याध्यक्ष उदयसिंह घोरपडे व राजन पाटील, सचिव चंद्रकांत झुरळे, दत्ताजी कदम, राजेंद्र पाटील, संदिप जाधव, प्रताप घोरपडे, नरेंद्र इनामदार, प्रसन्न मोहिते, विजय सासने, द्वारकानाथ नायडू, धनाजी लिंगम, अजित चिले, शांताराम आडूरकर व सहकार्यांनी केले. कोल्हापूर पोलिस दल, वाहतूक पोलिस, महापालिका, व्हाईट आर्मी यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी करण्यात आली.
मॅरेथॉनचा सविस्तर अनुक्रमे निकाल असा :
/इखुला गट : पुरुष (21.2 कि.मी.) हिरवा टी शर्ट :/इ दिपक कुंभार (109 टी.ए. बटालियन), चंद्रकांत मनवाडकर (चंदगड), तुकाराम मोरे व शहाजी किरुळकर (डब्ल्यू.आर.एस.एफ. कोल्हापूर), महेश खामकर (नाईट कॉलेज), अक्षय मोरे व उत्तम पाटील (वारणा वाय.सी.). /इमहिला खुला गट : (10 कि.मी.) : /इप्राजक्ता शिंदे (कोल्हापूर), सोनाली देसाई (कसबा बावडा), सायली कोकीतकर (गडहिंग्लज), रेखा रानगेट (वाय.के. स्पोर्टस सांगली), वर्षाराणी मगदूम (शिवराज कॉलेज गडहिंग्लज), शहाजादबी किल्लेदार (एस.डी. ज्यू. मुत्नाळ).
/इ45 वर्षांवरील प्रौढ : पुरुष (5 कि.मी.) पिवळा टी-शर्ट :/इ राजेंद्र सावेकर (छत्रपती शाहू कारखाना कागल), संभाजी सूर्यवंशी, कल्लाप्पा तिरवीर (पाचगांव), नितीन वाघमोरे (जवाहर कारखाना), आप्पासाहेब पाकळे जालंदर मगदूम (केडीसीसी बँक). /इमहिला (5 कि.मी.) : /इअनिता पाटील (उचगांव), अश्विनी जाधव, प्राजक्ता सरदेसाई, आसावरी गुप्ता (तिघी कोल्हापूर), सुषमा परुळेकर (बावडा), मंगल नारगोंडा (आर.के.नगर), शोभा नंदनवाडे (नागाळापार्क), लता परीट (मार्केट यार्ड)./इ 55 वर्षांवरील प्रौढ पुरुष :/इ पांडूरंग चौगुले (म्हाकवे), बाबासाहेब कोळी (सावर्डे-मिणचे), केरबा गुरव (कसबा तारळे), बाळासाहेब भोगम (फुलेवाडी), गोरखनाथ केकरे (कोडोली पन्हाळा).
/इ10 वयोगट : मुले (1 कि.मी.) गुलाबी टी-शर्ट : /इरखमाजी गडदे (सांगली), धैर्यशील पोवार (इंग्लिश स्कूल रुई), अथर्व तराळ (कणेश्वर हायस्कूल टाकवडे), अथर्व जाधव (भैरवनाथ स्पोर्टस बामणोळी), पार्थ परीट (इंचनाळ), सोहम कांजर (चनिशेट्टी निगवे खालसा), पार्थ सरगर (भैरवनाथ स्पोर्टस बामणोली). /इमुली (1 कि.मी.) : /इरागिणी कोरे (कन्या विद्यामंदीर टाकवडे), संचिता पाटील (व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी), श्रेया राजमाने (भैरवनाथ स्पोर्टस बामनोली), चैत्राली पाटील (केंद्रीय प्रा.शाळा केनवडे), स्वाती बेल्याळ (तात्यासाहेब मुसळे इचलकरंजी), दिशा गौड व रेखा अरुणदास (जि.प. शाळा बामणोळी).
/इ12 वयोगट : मुले (2 कि.मी.) निळा टी-शर्ट :/इ वाघूजी गावडे (कोलिक), आकाश कळमकर (निगवे), प्रथमेश सरगर, ऋतिक वर्मा (गडहिंग्लज), हर्षल पाटील (निगवे), दिनेश तराळ (टाकवडे), अवधूत शिंदे (निगवे). /इमुली (2 कि.मी.) :/इ ऋतूजा तळेकर, प्रियांका कुपटे, समिक्षा तोडकर, वैष्णवी ढेंगे, चंदना शिंदे, मानसी कागवाडे, समिक्षा कांझर.
/इ14 वयोगट : मुले (5 कि.मी.) पिवळा टी-शर्ट :/इ केशव पन्हाळकर (इचलकरंजी), आप्पासोा गडदे व आहूजा घागरे (सांगली), आदिनाथ रायकर व समिर किरुळकर (राधानगरी), प्रतिक पाटील (कोल्हापूर), ओमकुमार ढोमके (निमशिरगांव). /इमुली (5 कि.मी.) :/इ श्रृती कुंभार (नॅशनल स्पोर्टस टाकवडे), अंजली वायसे (राहुल आवाडे स्पोर्टस इचलकरंजी), स्वाती कलोळे (नॅशनल स्पो. टाकवडे), आदिती खोत (युवा अॅकॅडमी कसबा वाळवे), अवंतिका भोसले (तिरंगा स्कूल सातारा), अपुर्वा आडगाणे (नॅशनल स्पो.टाकवडे).
/इ17 वयोगट : मुले (6.2 कि.मी.) हिरवा टी-शर्ट /इ: धुळदेव घागरे (वाय.के. स्पो. सांगली), ओंकार पन्हाळकर व केशव माने (राहुल आवाडे स्पो. इचल.), ऋषीकेश माळकर (विजेता स्पो. अवचितवाडी), सत्यजीत पुजारी (डब्ल्यू आर एस.एफ कोल्हापूर). /इमुली (6.2 कि.मी) :/इ सृष्टी रेडेकर (एस.एस. हाय. नेसरी), पुर्वा शेवाळे (नॅशनल स्पो. टाकवडे), स्वाती घागरे (वाय.के. स्पोर्टस सांगली), निकीता बोंगार्डे (राहुल आवाडे स्पो. इचलकरंजी), वैष्णवी कागले (नॅशनल स्पो. टाकवडे), प्रियांका पाटील (नागेश्वर हायस्कूल शाहूवाडी).