David Warner Sandpaper Raw pudhari
स्पोर्ट्स

David Warner Sandpaper Raw: बळीचा बकरा केला... क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आधीच ठरवलं होतं... डेव्हिड वॉर्नरचा गंभीर आरोप

Anirudha Sankpal

David Warner Sandpaper Raw: ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील सँड पेपर प्रकरणाचं भूत अजूनही त्यांच्या मानगुटीवरून उतलेलं नाही. आता निृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने या प्रकरणात मला मुद्दाम टार्गेट करण्यात आलं त्यामुळं माझे खूप नुकसान झाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने समान न्यायाने वागणूक न दिल्याचा दावा देखील केला.

यानंतर त्याचा सलामीवीर जोडीदार उस्मान ख्वाजाने देखील निवृत्तीनंतर सँडपेपर प्रकरण हे संघातील प्रत्येकाला माहिती होते असा दावा करत खळबळ उडवून दिली. ख्वाजाच्या या वक्तव्यानंतर सध्याचा कर्णधार पॅट कमिन्सला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

आता डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एक सोशल मीडिया पोस्ट करत क्रिकेट ऑस्ट्रेलियावर निशाना साधला. त्याने माझ्या समजुतीनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१८ च्या तपासात जॉस हेजलवूड, मिचेल स्टार्क किंवा नॅथन लायन यांची मुलाखत घेतली नव्हती. जर ते खरं असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना काही माहिती नव्हतं असं कसं म्हणू शकते? असं वाटतंय की क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या गोष्टीचा सर्व दोष कोणाच्या माथी मारायचा हे आधीच ठरवलं होतं. त्यांनी चुकीचे नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी वरवरचा तपास केला अन् गोलंदाजांना याची काही कल्पना नव्हती असं सांगितलं आणि पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT