बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील राष्ट्रकुल क्रीडा (CWG 2022) स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारताने पाच सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकूण 15 पदके जिंकली. सिंधू आणि लक्ष्यच्या सुवर्णानंतर साथियानने कांस्यपदक जिंकले आहे. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 61 पदके जिंकली आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्णपदके मिळवून हॅट्ट्रिक नोंदवली. पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीत यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर लगेचच भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने मलेशियाच्या ची याँग एनजी याच्यावर पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये मात करून गोल्ड मेडल मिळवले. त्यानंतर सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीत सुवर्णपदक मिळवून हॅट्ट्रिक नोंदवली. हॉकीमध्ये पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाकडून 7-0 असे पराभूत व्हावे लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय पदकाचे मानकरी (CWG 2022)
22 सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन, भाविना (पैरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पांघल, एल्डहॉस पॉल, निखत झरिन, अचंथा आणि श्रीजा, पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक आणि चिराग शेट्टी, शरथ कमल.
16 रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल्स संघ, अब्दुल्ला अबोबैकर, शरथ आणि साथियां, सागर अहलावत, भारतीय महिला क्रिकेट संघ, भारतीय पुरुष हॉकी संघ.
23 कांस्य : गुरुराजा पुजारी, विजयकुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, सौरव घोषाल, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव घोषाल-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, सातीयन गणसेकरन.
देश गोल्ड सिल्व्हर ब्राँझ एकूण
1 ऑस्ट्रेलिया 67 57 54 178
2 इंग्लंड 57 66 53 176
3 कॅनडा 26 32 34 92
4 भारत 22 16 23 61
5 न्यूझीलंड 20 12 17 49
6 स्कॉटलंड 13 11 27 51