स्पोर्ट्स

CSKvsSRH : हैदराबादसमोर चेन्नईचे २०३ धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल हंगामातील ४६ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना पुण्याचा एमसीएस स्टेडियमवर होणार आहे. नाणेफेक जिंकून हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यंदाच्या हंगामाच्या आधी धोनीने कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर कर्णधार पदाची धुरा जडेजाकडे देण्यात आली.

परंतु, जडेजाच्या नेतृत्वामध्ये चेन्नईची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे संघाने कर्णधार पदाची धुरा पुन्हा धोनीकडे देण्याचा निर्णय घेतला. यामुळे धोनी चेन्नईची पराभवाची मालिका खंडित करून संघाला विजयी मार्गावर पुन्हा आणेल असा विश्वास संघाच्या समर्थकांना आहे. चेन्नईने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यातील २ सामन्यात त्यांनी विजय मिळवता आला. गुणतालिकेत ते सध्या चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे सनराईजर्स हैदराबाद गेल्या काही सामन्यांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. त्यांनी ८ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे.

चेन्नईची फलंदाजी

  • हैदराबादसमोर चेन्नईचे २०३ धावांचे आव्हान
  • अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला दुसरा धक्का
  • ऋतुराज गायकवाड शतकाला अवघ्या एका धावाने मुकला
  • १५ ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर नाबाद १५३
  • चेन्नई १५० धावांच्या पार
  • चौदा ओव्हरनंतर चेन्नईचा नाबाद १३३ धावा स्कोर
  • चेन्नईचे शतक पूर्ण
  • ऋतूराज गायकवाडचे अर्धशतक पूर्ण
  • नऊ ओव्हरनंतर चेन्नई नाबाद ७४ धावा
  • सहा ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर नाबाद ४० धावा
  • नाणेफेक जिंकून हैदराबादचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT