स्पोर्ट्स

CSKvsPBKS : पंजाबने ठेवले चेन्नईसमोर १८८ धावांचे शिखर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई : आयपीएल २०२२ हंगामात आज चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. मुंबईविरूध्दच्या सामन्यात चेन्नईने रोमहर्षक विजय मिळवला होता. आज सीएसके ही विजयी पताका कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच पंजाब विरूद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सीएसके काढण्यासाठी मैदानात उतरेल. पंजाबाला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. गेल्या सात सामन्यात पंजाबला फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेमध्ये ते सहा गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

पंजाबच्या संघात तीन बदल

चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही, तर पंजाब किंग्जने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. शाहरूख खान, वैभव अरोरा आणि नॅथन अॅलिस यांनी बेंचवर बसवून त्यांच्या जागी संदीप शर्मा, ऋषी धवन आणि भानुका राजपक्षा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पंजाब फलंदाजी

नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना पंजाबने ४ गडी गमावून १८८ धावा केल्या. १८८ धावांचे लक्ष उभारताना शिखर धवनने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे पंजाबने ही धाव संख्या उभी केली.

लाईव्ह अपडेट्स

  • पंजाबला तिसरा धक्का; लिविंगस्टोन ७ चेंडूत १९ धावा करून बाद
  • राजपक्षे ४२ धावा करून माघारी
  • शिखर धवनची धडाकेबाज फलंदाजी
  • शिखर धवनचे ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण
  • १२ षटकांनंतर पंजाबचा स्कोर १ बाद ९४ धावा
  • ८ षटकांनंतर पंजाबचा स्कोर १ बाद ५१
  • पंजाबला मयांक अग्रवालच्या रूपात पहिला धक्का
  • नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
  • चेन्नईने नाणेफेक जिंकली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT