पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रदर्शन आतापर्यंत खूपच खराब राहिले आहे. हा संघ गुणतालिकेत सध्या सगळ्यात खालच्या स्थानावर आहेत. या दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सच्या एका स्टार अष्टपैलू खेळाडूने तामिळनाडूतील 10 उदयोन्मुख खेळाडूंकरता मोठी घोषणा केली आहे. CSK च्या या खेळाडूने तामिळनाडू स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन अवॉर्ड अँड स्कॉलरशिप या कार्यक्रमाच्या वेळी हा निर्णय जाहीर करून सर्वांची मने जिंकली.