नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा डाव्या हाताचा गोलंदाज चेतन सकारिया याने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सकारियाने गेल्या सोमवारी आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने पंजाब किंग्ज विरोधात खेळलेल्या डेब्यू मॅचमध्ये तीन विकेट घेतल्या. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.
वाचा : IPL : चेतन साकरिया 'असामान्य धैर्य'
चेतन सकारियाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात आपल्या चार षटकांत ३१ धावा देत पंजाब किंग्जच्या तीन खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राजस्थानने सकारियाला आयपीएल लिलावात १ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केले होते.
राजस्थान रॉयल्स फ्रँचाइजीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात टीमचा वेगवाग गोलंदाज आकाश सिंह आणि चेतन सकारिया आनंदाच्या मूडमध्ये एक दुसऱ्याची मुलाखत घेताना दिसत आहेत. चेतन या व्हिडिओत म्हणतो की युवराज सिंह माझा आदर्श आहे.
वाचा : MIvsKKR : चाहरचा कहर; जिंकणारा केकेआर हरला
आकाश सिंहने चेतनला, 'तुला कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री सोबत डेटवर जायला आवडेल' असे विचारले असता चेतनने अनन्या पांडेचे नाव घेतले. अनन्या खूप सुंदर आहे आणि तिच्यासोबत कोणत्यातरी बीचवर कॉफीचा आस्वाद घ्यावसा वाटतो, अशी इच्छा चेतनने यावेळी व्यक्त केली.
वाचा : विराट कोहलीला मागे टाकत पाकचा बाबर आझम नंबर वन!