पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ आपापल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहेत. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करत न्युझीलंडने दक्षिण अफ्रिकेसमोर 159 धावांचे लक्ष ठेवले आहे.
विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात सुझी बेट्सने 32 धावांची, अमेलिया केरने 43 धावांची आणि ब्रूक हॅलिडेने 38 धावांची दमदार खेळी केली आहे. तिघींच्याही कामगिरीमुळे संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. द. आफ्रिकेकडून मलाबाने दोन तर खाका, ट्रायन आणि नदिन डी क्लर्क यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
एकाच वर्षीच्या आयसीसीच्या विश्वचषक सामन्यामध्ये पुरुष संघ आणि महिला संघ विश्वचषकाच्या अतिंम सामन्यात धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. या आधी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज संघाने ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया 2010 मध्ये तर वेस्ट इंडीज संघाने 2016 मध्ये ही कामगिरी केली आहे. तर 2024 मध्ये अशी कामगिरी करणारा दक्षिण अफ्रिका ही तिसरा संघ ठरला.