FIFA World Cup 2026 | वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर! पदार्पण करणाऱ्या केप व्हर्डेने स्पेनला गोलशून्‍य बरोबरीत रोखले 
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 | वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर! पदार्पण करणाऱ्या केप व्हर्डेने स्पेनला गोलशून्‍य बरोबरीत रोखले

पुढारी वृत्तसेवा

अटलांटा (अमेरिका); वृत्तसंस्‍था : फिफा वर्ल्ड कपच्या ग्रुप ‘एच’च्‍या सलामीच्या सामन्यात फुटबॉल जगतातील सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. युरोपियन चॅम्पियन आणि माजी विश्वविजेत्या स्पेनला, वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या केप व्हर्डे संघाने ०-० अशा ऐतिहासिक बरोबरीत रोखले. अटलांटा येथील मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केप व्हर्डेच्या अभेद्य बचावाने इतिहास रचला.

स्पेनचे निर्भेळ वर्चस्व, मात्र...

सामन्यात सुरुवातीपासूनच स्पेनने अपेक्षेप्रमाणे चेंडूवर ७४ टक्के नियंत्रण राखले. त्यांनी केप व्हर्डेच्या गोलपोस्टवर एकूण २३ शॉटस्‌ मारले, यातील ८ शॉटस्‌ ऑन-टार्गेट होते. मात्र, केप व्हर्डेच्या बचाव फळीने अप्रतिम ब्लॉक्स करत स्पेनला गोल करू दिला नाही. स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस डी ला फुएंटे यांनी ७१ व्या मिनिटाला गॅव्हेच्या जागी यामालला उतरवले. त्यापाठोपाठ डॅनी ओल्मो आणि निको विल्यम्स यांनाही संधी दिली; परंतु केप व्हर्डेच्या लोपेस आणि बॉर्जेस यांनी उत्कृष्ट टॅकल करत स्पेनचे आक्रमण निष्प्रभ केले.

४० वर्षांचा वोझिन्हा ठरला ‘द वॉल’

केप व्हर्डेचा कर्णधार आणि ४० वर्षीय गोलकीपर वोझिन्हा या सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने स्पेनचे तब्बल ८ मोठे गोलचे प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या हाफमध्ये त्याने फेरान टॉरेसचे सलग तीन प्रयत्न अपयशी ठरवले. यामाल आणि ओल्मोची रणनीती देखील स्‍पेनला काहीच यश मिळवून देऊ शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT