Prichard Colon death | २०१५ मधील लढतीत गंभीर जखमी झालेल्‍या मुष्‍टियोद्धा प्रिचार्ड कोलन याचे निधन 
स्पोर्ट्स

Prichard Colon death | २०१५ मधील लढतीत गंभीर जखमी झालेल्‍या मुष्‍टियोद्धा प्रिचार्ड कोलन याचे निधन

११ वर्षे होता रुग्‍णशय्‍येवर; ३३ व्‍या वर्षी घेतला अखेरचा श्‍वास

पुढारी वृत्तसेवा

न्‍यूयॉर्क; वृत्तसंस्‍था : २०१५ मधील एका बॉक्सिंग सामन्यादरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झालेला बॉक्सिंगपटू प्रिचार्ड कोलन याचे वयाच्या ३३ व्या वर्षी निधन झालेे. त्याचे वडील रिचर्ड कोलन यांनी सोशल मीडियाद्वारे या दुःखद बातमीची माहिती दिली.

२०१५ मध्ये टेरेल विल्यम्स विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान कोलन याने त्‍याच्‍या डोक्याच्या मागील भागावर वारंवार बेकायदेशीर ठोसे मारले जात असल्याची तक्रार पंचांकडे केली होती. हा सामना संपल्यानंतर कोलन ड्रेसिंग रूममध्ये कोसळला होता. मेंदूतील रक्तस्राव आणि सूज कमी करण्यासाठी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तो तब्‍बल २२१ दिवस कोमामध्ये होता. या दुखापतीमुळे कोलनला आयुष्यभर व्हेजिटेटिव्ह अवस्थेतच (बोलणे किंवा चालणे अशक्य असलेली गंभीर वैद्यकीय स्थिती) राहावे लागले आणि त्याला २४ तास वैद्यकीय सेवेची गरज होती. टेरेल विल्यम्सविरुद्धच्या या सामन्यापूर्वी कोलन याने १६ पैकी सर्व सामने जिंकले होते, त्‍यातील १३ विजय नॉकआऊटद्वारे मिळवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT