पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy Team India : सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर रोहितसेना पुढील महिन्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्रस्थानाची तारीख जाहीर झाली आहे. टीम इंडिया 10 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
वृत्तानुसार, भारतीय संघ पुढील महिन्याच्या 10 तारखेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असेल. जिथे दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
कांगारूंच्या भूमीवर पोहोचल्यानंतर भारताला 15 नोव्हेंबरला सराव सामना खेळायचा आहे. हा सामना 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान भारत अ विरुद्ध होणार आहे. यानंतर 22 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथील WACA क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यानंतर 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरी कसोटी सुरू होईल. या सामन्यापूर्वी आणखी एक सराव सामना खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली प्रमुख खेळाडूंव्यतिरिक्त काही नव्या चेहऱ्यांनाही संघात संधी देण्यात आली आहे. यात हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या तिसऱ्या आवृत्तीचा विचार करता ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सएअफ्राज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद