Bhuvneshwar Kumar Vs Mohammed Shami: भारताने न्यूझीलंड विरूद्धची मालिका ३-२ अशी जिंकली. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेवर आधीच कब्जा केला होता. मात्र पुढच्या दोन सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. विशेष म्हणजे भारताचा स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची ही पुनरागमनाची मालिका होती. मात्र त्याची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही.
भुवनेश्वर कुमारच्या या कामगिरीवर माजी खेळाडू आर अश्विनने आपल्या खास शैलीत टिप्पणी केली आहे. त्याने आता भुवनेश्वर कुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला ब्रेक लागल्याचे सुतोवाच दिले. भुवनेश्वर कुमारला न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत ३६ वर्षाच्या भूवीला फक्त एक विकेट घेता आली. ज्या प्रकारे त्याने आयपीएल २०२६ मध्ये कामगिरी केली होती. त्यापेक्षा फारच सुमार कामगिरी या मालिकेत त्याच्याकडून झाली आहे. त्यावल अश्विन म्हणतो की भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी केली नाही. त्याला त्याचा फॉर्म सिद्ध करता आला नाही.'
अश्विन आपल्या युट्यूबवरील व्हिडिओत म्हणतो की, 'भुवनेश्वरच्या आयपीएल आणि न्यूझीलंड मालिकेतील कामगिरीत जमीन आस्मानचा फरक आहे. मला वाटतं की आता त्याचा चाप्टर क्लोज झाला आहे. त्याला इथून कमबॅक करणे खूप अवघड आहे.'
भूवनेश्वरने आयपीएलमध्ये १६ सामन्यात २८ विकेट्स घेतल्या होत्या. तो त्या सीजनमधील सर्वोत्तम गोलंदाज होता. या कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमारला भारतीय टी २० संघात स्थान द्यावं लागलं. मात्र न्यूझीलंड दौऱ्यात त्याला चार सामन्यात फक्त १ विकेट घेता आली. त्याचा इकॉनॉमी रेट देखील ११.५० होता.
अश्विने भुवनेश्वरबाबत नेमकं काय झालं हे आपल्या व्हिडिओत सांगितलं. तो म्हणाला, 'कामगिरी सोडा, दिलेल्या जास्त धावा देखील सोडून द्या हे त्या बाबतीत नाही. सर्वात निराशाजनक काय आहे तर मला वाटतं की ज्या प्रकारे तो आयपीएलमध्ये कामगिरी करत होता. ती इंटेनसिटी आणि त्याचा रन अपचा स्पीड हा कमी होता. तो तुलनेनं कमी स्पीडने गोलंदाज करत होता. यावरून असं दिसतं की तो या मालिकेत चांगली प्रॅक्टिस करून आलेला नव्हता.
अश्विन पुढे म्हणतो, 'जर अशी परिस्थिती असेल तर निवडसमिती देखील विचार करतील. तुम्ही जर नवीन मुलगा असता तर तुम्हाला १० संधी मिळाल्या असत्या. मात्र तुम्हा अनुभवी असून तुम्ही कमबॅक करत आहात.'
अश्विनने मोहम्मद शमीबाबत देखील वक्तव्य केलं. तो म्हणाला की, शमी जवळपास दीड वर्षापासून टीम इंडियाकडून खेळत नाहीये. आता त्याला भूवनेश्वरपेक्षा जास्त संधी आहे. शमी चांगल्या लयीत दिसत आहे.
अश्विन म्हणतो, सध्याच्या घडीला मला वाटतं की शमी हा रणजी ट्रॉफीत तो चांगल्या लयीत गोलंदाजी करत आहे. भुवनेश्वरपेक्षा तो चांगली कामगिरी करत आहे. आता भारतीय संघ डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरूद्ध मायदेशात ३ सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे.