Bhuvneshwar Kumar NZ vs IND pudhari
स्पोर्ट्स

Bhuvneshwar Kumar NZ vs IND: तब्बल ८८ टी २० सामन्यांनंतर भुवनेश्वरच्या कारकिर्दीवर लागला 'डाग', १७९१ चेंडूनंतर तुटला सिलसिला

आजच्या सामन्यातील एक नो बॉल भुवनेश्वर कुमारच्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक दाग लावून गेला.

Anirudha Sankpal

Bhuvneshwar Kumar No Ball NZ vs IND: भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांनी चार वर्षानंद न्यूझीलंड दौरा केला. त्याने गुरूवारच्या क्राईस्टचर्चमध्ये झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुरा खांद्यावर वाहिली. दीर्घ काळानंतर भारताकडून खेळताना भुवनेश्वर कुमारने पहिले षटक चांगले टाकत फक्त ४ धावा दिल्या. मात्र त्यानंतरचे पुढचे षटक टाकताना त्याने टीम सैफर्टला नो बॉल टाकला. हाच नो बॉल भुवनेश्वर कुमारच्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक दाग लावून गेला.

भुवीने पहिल्यांदाच टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात नो बॉल टाकला. त्याने आतापर्यंत ८८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने एकही नो बॉल टाकला नव्हता. मात्र आता १७९१ चेंडूंनंतर भूवीचा हा सिलसिला तुटला आहे.

शादाबला टाकलं मागे

३६ वर्षाच्या भूवीने वेस्ट इंडीजविरूद्धच्या पाच टी २० सामन्यांत पुनरागमन केलं होतं. मात्र पावसामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. आज अखेर त्याला २०२२ नंतर भारताकडून प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. भूवनेश्वर कुमारने टी २० क्रिकेटमध्ये नो बॉल न टाकता सर्वाधिक षटके गोलंदाजी करणाऱ्या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहचला आहे.

भूवीने २९९,३ षटके एकही नो बॉल न टाकता पूर्ण केली आहेत. या यादीत त्याच्या पुढे आदिल राशिद आहे. त्याने ३२०.२ षटकात एकही नो बॉल टाकला नाहीये. भूवीने या यादीत शादाब खानला मागे टाकले. त्याने २९९.१ षटकात एकही नो बॉल टाकला नव्हता. त्यानंतर आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल असून त्याने २५०.२ षटके एकही नो बॉल न टाकता पूर्ण केली आहेत.

नो बॉल न टाकण्याचा सिलसिला तुटला मात्र...

भूवीचा जवळपास ३०० षटके नो बॉल न टाकण्याचा सिलसिला संपुष्टात आला असला तरी त्याने एक मोठा माईलस्टोन पार केला. भुवनेश्वर कुमार हा टी २० पूर्ण सभासद संघांमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वात जास्त डॉट चेंडू टाकणारा गोलंदाज झाला आहे. त्याने ६७९ चेंडू निर्धाव टाकले आहेत. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ बाद २२५ धावा केल्या आहेत.

टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज

  • 682 - भुवनेश्वर कुमार (भारत)

  • 679 - टिम साउदी (न्यूजीलँड)

  • 674 - रिचर्ड नगारवा (झिम्बाब्वे)

  • 625 - शाहीन अफरीदी (पाकिस्तान)

  • 614 - ब्लेसिंग मुजरबानी (झिम्बाब्वे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT