Mustafizur Rahman IPL 2026 Pudhari
स्पोर्ट्स

IPL 2026: BCCIचा मोठा निर्णय! KKR संघातून मुस्तफिजुर रहमान बाहेर; शाहरुख खानला झटका, काय आहे प्रकरण?

Mustafizur Rahman IPL 2026: बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला IPL 2026 मधून वगळण्याचे आदेश BCCIने दिले आहेत. Kolkata Knight Riders संघाला मोठा फटका बसला आहे.

Rahul Shelke

KKR Mustafizur Rahman IPL 2026: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाइट रायडर्स संघातून वगळण्याचे निर्देश BCCIने दिले आहेत. शाहरुख खानच्या मालकीच्या Kolkata Knight Riders (KKR) संघाला मुस्तफिजुरला रिलीज करण्यास सांगण्यात आले असून, त्याच्या बदल्यात दुसरा खेळाडू घेण्याची परवानगीही बोर्डाकडून देण्यात आली आहे.

BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, “सध्याची परिस्थिती लक्षात घेता KKR संघाने मुस्तफिजुर रहमानला रिलीज करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. संघाला हवे असल्यास पर्यायी खेळाडू घेण्याची मुभा दिली जाईल.”

नेमकं प्रकरण काय आहे?

अलीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात असंतोष पसरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो-व्हिडिओंमुळे संताप वाढला आणि अनेक संघटनांनी बांगलादेशी खेळाडूंना आयपीएल 2026 मध्ये खेळू देऊ नये, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर मुस्तफिजुर रहमानला KKR मधून वगळण्याचा दबाव वाढला.

या मुद्द्यावरून काही राजकीय नेत्यांनीही थेट शाहरुख खान आणि KKR व्यवस्थापनावर टीका केली होती. त्यामुळे हा विषय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचा मुद्दा बनला.

KKR साठी मोठा धक्का

मुस्तफिजुर रहमानला KKR ने डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या मिनी लिलावात तब्बल 9.20 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याची बेस प्राइस 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्ससोबत चुरशीच्या बोलीनंतर KKR ने त्याला संघात घेतले होते. डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करणारा मुस्तफिजुर KKR साठी ‘मॅच-विनर’ ठरू शकतो, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला होता.

आयपीएलमधील अनुभव

मुस्तफिजुर रहमान 2016 पासून आयपीएल खेळत आहे. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स अशा अनेक संघांकडून तो खेळला आहे. आतापर्यंत 60 आयपीएल सामन्यांत त्याने 65 विकेट्स घेतल्या आहेत.

भारत-बांगलादेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह?

दरम्यान, भारताचा सप्टेंबर 2026 मध्ये बांगलादेश दौरा प्रस्तावित असून त्यात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा दौरा होणार की नाही, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यावर BCCI कडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT