bcci changes team india home series schedule check new match venues
वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौ-यावर येणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौ-यांच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑक्टोबरमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिका खेळवल्या जातील.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, पण सुधारित वेळापत्रकानुसार, हा सामना आता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार होता मात्र, आता तो कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर शिफ्ट करण्यात आला आहे. उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.
कसोटी मालिका
पहिली कसोटी : 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद
दुसरी कसोटी : 10 ते 14 ऑक्टोबर, नवी दिल्ली
कसोटी मालिका
पहिली कसोटी : 14 ते 18 नोव्हेंबर, कोलकाता
दुसरी कसोटी : 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी
वनडे मालिका
पहिला वनडे सामना : 30 नोव्हेंबर, रांची
दुसरा वनडे सामना : 3 डिसेंबर, रायपूर
तिसरा वनडे सामना : 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
टी-20 मालिका
पहिला टी-20 सामना : 9 डिसेंबर, कटक
दुसरा टी-20 सामना : 11 डिसेंबर, मुल्लानपूर
तिसरा टी-20 सामना : 14 डिसेंबर, धर्मशाला
चौथा टी-20 सामना : 17 डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी-20 सामना : 19 डिसेंबर, अहमदाबाद
दुसरीकडे, भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. पहिले दोन वनडे सामने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार होते, परंतु आता ते मुल्लानपूर येथे शिफ्ट करण्यात आले आहेत. एमए चिदंबरम स्टेडियममधील आउटफिल्ड आणि खेळपट्ट्यांच्या नूतनीकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.
पहिला वनडे सामना : 14 सप्टेंबर, मुल्लानपूर
दुसरा वनडे सामना : 17 सप्टेंबर, मुल्लानपूर
तिसरा वनडे सामना : 20 सप्टेंबर, नवी दिल्ली
द. आफ्रिकेचा पुरुष-अ संघ ऑक्टोबर महिन्यात भारत दौ-यावर येणार आहे. हा संघ भारत-अ संघाशी भिडणार आहे. उभय संघांमध्ये दोन चार दिवसीय सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जातील. हे सामने अनौपचारिक असतील. 30 ऑक्टोबरपासून पहिला चार दिवसीय सामना सुरू होईल, जो पूर्वीप्रमाणेच बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे खेळला जाईल. दुसरा चार दिवसीय सामनाही याच मैदानावर होईल. यानंतर वनडे सामने बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले जाणार होते, पण ते आता राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होतील.
चार दिवसीय सामने
पहिला 4 दिवसांचा सामना : 16 ते 19 सप्टेंबर, लखनौ
दुसरा 4 दिवसांचा सामना : 23 ते 26 सप्टेंबर, लखनौ
वनडे सामने
पहिला वनडे सामना : 30 सप्टेंबर, कानपूर
दुसरा वनडे सामना : 3 ऑक्टोबर, कानपूर
तिसरा वनडे सामना : 5 ऑक्टोबर, कानपूर
चार दिवसीय सामने
पहिला 4 दिवसांचा सामना : 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, (बीसीसीआय सीओई)
दुसरा 4 दिवसांचा सामना : 6 ते 9 नोव्हेंबर, (बीसीसीआय सीओई)
वनडे सामने
पहिला वनडे सामना : 13 नोव्हेंबर, राजकोट
दुसरा वनडे सामना : 16 नोव्हेंबर, राजकोट
तिसरा एकदिवसीय सामना : 19 नोव्हेंबर, राजकोट