पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2025 मधील टीम इंडियाच्या देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बुधवारी मंडळाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौऱ्यावर येतील.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळला जाईल तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून कोलकातामध्ये सुरू होईल. यानंतर द. आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येईल. या काळात दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका, 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगणार आहे.
द. आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ऐतिहासिक ठरेल. कारण गुवाहाटीत पहिला कसोटी सामना होणार आहे. ही मालिका 14 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथील सामन्याने सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. डिसेंबरमध्ये भारत आणि द. आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल, ज्यातील शेवटची लढत अहमदाबादमध्ये होईल.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा :
पहिली कसोटी : 2 ऑक्टोबर 2025 ते 6 ऑक्टोबर 2025, अहमदाबाद
दुसरी कसोटी : 10 ऑक्टोबर 2025 ते 14 ऑक्टोबर 2025, कोलकाता
द. आफ्रिका संघाचा भारत दौरा
पहिली कसोटी : 14 नोव्हेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 (नवी दिल्ली)
दुसरी कसोटी : 22 नोव्हेंबर 2025 ते 26 नोव्हेंबर 2025 (गुवाहाटी)
पहिली वनडे : 30 नोव्हेंबर 2025, दुपारी 1:30 वा. (रांची)
दुसरी वनडे : 3 डिसेंबर 2025, दुपारी 1:30 वा. (रायपूर)
तिसरी वनडे : 6 डिसेंबर 2025, दुपारी 1:30 वा. (विशाखापट्टणम)
पहिला टी20 सामना : 9 डिसेंबर 2025, संध्याकाळी 7 वा. (कटक)
दुसरा टी20 सामना : 11 डिसेंबर 2025, संध्याकाळी 7 वा. (न्यू चंदीगड)
तिसरा टी20 सामना : 14 डिसेंबर 2025, संध्याकाळी 7 वा. (धर्मशाला)
चौथा टी20 सामना : 17 डिसेंबर 2025, संध्याकाळी 7 वा. (लखनौ)
पाचवा टी20 सामना : 19 डिसेंबर 2025, संध्याकाळी 7 वा. (अहमदाबाद)