Basit Ali : बासित अली यांनी पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत.  Basit Ali File Photo
स्पोर्ट्स

Basit Ali | ... तर पाकिस्तान क्रिकेट 'उद्ध्वस्त' होईल, माजी क्रिकेटपटूचे भाकीत

बासित अलीचा पीसीबीवर गंभीर आरोप

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. या अली यांनी टी-20 विश्वचषकातील सुमार कामगिरीसाठी व्यवस्थापन कर्णधार बाबर आझमची बाजू घेत आहे आणि टी-20 विश्वचषकातील कामगिरीसाठी शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांना बळीचा बकरा बनवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये बासित अली यांनी दावा केला आहे की मॅनेजमेंट टीमच्या खराब कामगिरीसाठी आफ्रिदी आणि रिजवानला जबाबदार धरण्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. पुढे ते म्हणाले की, असं करू नका अन्यथा पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त होईल.

तर 'पाकिस्तान क्रिकेट नष्ट उद्ध्वस्त'

पाकिस्तानसाठी 19 कसोटी आणि 50 एकदिवसीय सामने खेळलेल्या बासित अली यांनी म्हटले आहे की, गटबाजीच्या माध्यमातून शाहीन शाह आफ्रिदी आणि रिझवानच्या विरोधात अहवाल तयार केले जात आहेत. हे चुकीचे आहे. अशामुळे पाकिस्तानचे क्रिकेट उद्ध्वस्त होईल.

सर्वांना समान न्याय द्या

विश्वचषकातील सुमार कामगिरीसाठी शाहिन शाह आफ्रिदी आणि रिझवान यांना दोषी ठरवून चालणार नाही. यामध्ये कर्णधार बाबरला देखील जबाबदार आहे. आणि कोणाला यातून वगळायचे असेल तर, एकाला न वगळवता सर्वांना समान न्याय दिला पाहिले असे बासित अली यांनी म्हटले आहे.

बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह

बासित अलीने बाबर आझमच्या कर्णधारपदावरही टीका केली. ते म्हणाले, 'हे चुकीचे आहे. बाबरने कर्णधार म्हणून काय केले? केवळ या स्पर्धेतच नाही तर गेल्या विश्वचषकापासून तो कर्णधारपद भूषवत आहे.

अवघ्या ५ सामन्यांत आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवले

अवघ्या पाच सामन्यांनंतर शाहीन आफ्रिदीला कर्णधारपदावरून हटवण्याच्या निर्णयावरही बासित अली यांनी वक्तव्य केले. ते म्हणाला, 'तुम्ही मला सांगा पाच सामन्यानंतर एखाद्याला कर्णधारपदावरून हटवले तर तो नाराज होणार नाही का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT