कागिसो रबाडा ( kagiso rabad) कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 300 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.  File Photo
स्पोर्ट्स

रबाडा 'सुसाट'...पाकिस्‍तानच्‍या वकार युनूसचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!

kagiso rabad : सर्वात कमी चेंडूत गाठला ३०० बळींचा टप्‍पा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्‍यात क्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ( kagiso rabad) याने बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्‍यात भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 300 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्‍याने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनूसचा विश्वविक्रम उद्ध्वस्त केला आहे. तसेच रबाडा 300 हून अधिक कसोटी बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा केवळ सहावा गोलंदाज ठरला आहे.

kagiso rabad | रबाडा@ 300

कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमान बांगलादेशची अवस्था बिकट झाली आहे. लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशच्या खात्यात केवळ ६० धावांमध्‍येच सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. विआन मुल्डरने बांगलादेशच्या टॉप-3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर रबाडाने मुशफिकुर रहीमच्या रूपाने बांगलादेशला चौथा धक्का दिला, जो रबाडाचा कसोटी क्रिकेटमधील 300 वा बळी ठरला.

११८१७ चेंडूत ३०० विकेट

कसोटी क्रिकेटमध्‍ये सर्वात कमी चेंडूत ३०० बळी घेण्‍याचा विक्रम पाकिस्‍तानचा गोलंदाज वकार युनूस यांच्‍या नावावर होता.त्‍याने १२६०५ चेंडूत ३०० बळी घेतले होते. आता तो विक्रम रबाडाने मोडला आहे. त्‍याने त्‍याने ११८१७चेंडूत ३०० विकेटचा टप्‍पा पूर्ण केला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचाच डेल स्टेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्‍याने १२६०५ चेंडूत ही कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेचाच ॲलन डोनाल्डने १३७६२ चेंडूत 300 विकेट्स पूर्ण केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज माल्कम मार्शलचा हा पाचव्‍या क्रमाकावर असून त्‍याने १३ हजार ७२८ चेंडूत कसोटी क्रिकेटमध्‍ये 300 बळी घेतले होते.

द. आफ्रिकेच्‍या गोलंदाजीच्‍या यादीत रबाडा सहाव्‍या स्‍थानी

दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडा सहाव्या स्थानावर आहे. ३०० हून अधिक कसोटी बळी घेणारा रबाडा दक्षिण आफ्रिकेचा सहावा गोलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर डेल स्टेन आहे, त्‍याने आपल्‍या आतंररष्‍ट्रीय क्रिकेटच्‍या कारकर्दीत ४३९ कसोटी बळी घेतले आहेत तर शॉन पोलॉक ४२१ कसोटी बळी घेत दुसर्‍या स्‍थानी आहे, मखाया एनटिनी ३९०, ॲलन डोनाल्ड 330 हे अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्‍या स्‍थानी आहेत. मॉर्नी मॉर्केलने 309 कसोटी बळी घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT