पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाला आता ॲडलेड कसोटीपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्याला वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड मुकणार आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-1 ने पिछाडीवर आहे. अशाच आता दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड ॲडलेट कसोटीला मुकणार आहे. हेझलवूडची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियनसाठी मोठा धक्का आहे. हेझलवूडने डिसेंबर २०२१ मध्ये ॲडलेडमध्ये भारताविरुद्ध डे-नाईट कसोटीत पाच षटकांत ५ धावा देत ८ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात भारताचा डाव ३६ धाववरच गुंडाळला होता. पर्थ कसोटीतही त्याने पहिल्या डावात २९ धावांत ४ बळी घेतले होते.
आता हेझलवूडच्या जागाी वेगवान गोलंदाज शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांना संधी देण्यात आली ाहे. लीड्स येथे 2023 च्या ऍशेस कसोटीत शेवटचा खेळलेला बोलंड, ॲडलेड कसोटीपूर्वी पंतप्रधान इलेव्हन सराव सामन्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. ॲबॉटने 261 प्रथमश्रेणी विकेट्ससह अलीकडेच तस्मानियाविरुद्ध 71 धावांत 4 बळी घेतले होते. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच बळी घेणाऱ्या डॉगेटने या मोसमाच्या सुरुवातीला भारत अ विरुद्ध 15 धावांत 6 बळी मिळवून कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली होती. या दोन्ही वेगवान गोलंदाजांचा यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला होता, परंतु त्यांना अद्याप पदार्पण झालेले नाही. डॉगेट हा 2018 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या UAE दौऱ्याचा संघात होता तर ॲबॉटला भारताविरुद्धच्या 2020-21 घरच्या मालिकेदरम्यान संघात स्थान देण्यात आले होते.