स्पोर्ट्स

AUS vs BAN : पॅट कमिन्सची हॅटट्रिक; डकवर्थ लुईसने ऑस्ट्रेलिया विजयी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपर-8 सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत आठ गडी गमावून 140 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसामुळे खेळ थांबेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 11.2 षटकांत दोन गडी गमावून 100 धावा केल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंसख्या बरोबर 72 होती. यापुढे कांगारू संघ 28 धावांनी पुढे होता. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना पुढे जाऊ शकला नाही, यामुळे ऑस्ट्रेलियाने सामन्यात सहज विजय मिळवला.

सुपर 8 फेरीतील ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी पराभूत केले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने संघाला चांगली सुरूवात करून दिली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत आठ गडी गमावून 140 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पावसामुळे खेळ थांबेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 11.2 षटकांत दोन गडी गमावून 100 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, यावेळी ऑस्ट्रेलियाची बरोबरी 72 धावा होती. यापुढे कांगारू संघ 28 धावांनी पुढे होता. यामुळे ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला.

बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूत आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 28 वे अर्धशतक झळकावले. तो 35 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 53 धावा करून नाबाद राहिला आणि ग्लेन मॅक्सवेल सहा चेंडूत 14 धावा करून नाबाद राहिला.

भारतीय संघ सुपर-8 च्या ग्रुप-1 मध्ये अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. आता 22 जून रोजी होणाऱ्या सुपर-8 च्या पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी करायचा आहे. तर बांगलादेशचा संघ २२ जूनला बांगलादेशशी भिडणार आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 8 गडी गमावून ऑस्ट्रेलियासमोर 141 धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये कर्णधार नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली, तर तौहीद हृदयॉयने 40 धावांची खेळी केली.

पॅट कमिन्सची शानदार हॅटट्रिक

गोलंदाजीमध्ये पॅट कमिन्सने शानदार कामगिरी केली. टी- 20 विश्वचषक 2024 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्याचबरोबर टी-20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो सातवा ठरला. टी-20 विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा कमिन्स हा ब्रेट लीनंतरचा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. लीने 2007 च्या टी-20 विश्वचषकात ही कामगिरी केली होती.

कमिन्सने 18व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांना बाद केले होते. यानंतर कमिन्सने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहीदला बाद करून विशेष कामगिरी केली. कमिन्सशिवाय ॲडम झाम्पाने दोन बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

कर्णधार शांतो आणि तौहीद यांच्याशिवाय बांगलादेशकडून एकाही फलंदाजाला सन्मानजनक खेळी करता आली नाही. स्टार्कने पहिल्याच षटकात तनजीद हसनला (0) क्लीन बोल्ड करून संघाला पहिला धक्का दिला. यानंतर लिटन दासने शांतोच्या साथीने 58 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र झम्पाने ही भागीदारी फोडली. त्याने लिटनला क्लीन बोल्ड केले.

यानंतर रिशाद हुसेन दोन धावा करून मॅक्सवेलचा बळी ठरला. झम्पाने फिरकीची जादू पुन्हा एकदा कामी आली आणि त्याने शांतोला एलबीडब्ल्यू बाद केले. शांतोने 36 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. शाकिब अल हसनला (8) स्टॉइनिसने त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. महमुदुल्लाह दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि मेहदी खाते न उघडता परतला. तस्किन सात चेंडूत १३ धावा करून नाबाद राहिला आणि तन्झीम हसन शाकिब चार धावा करून नाबाद राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT