Elena rybakina wins Australian open 2026
मेलबर्न : एलिना रायबाकिना हिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या आर्यना सबालेन्काचा पराभव करत वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम 'ऑस्ट्रेलियन ओपन'चे जेतेपद पटकावले. तब्बल दोन तास १८ मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात रायबाकिनाने सबालेन्कावर ६-४, ४-६, ६-४ असा विजय मिळवला. २६ वर्षीय रायबाकिनाने या सामन्यात शानदार पुनरागमन करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या चषकावर आपले नाव कोरले. हे तिच्या कारकिर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे; यापूर्वी तिने २०२२ मध्ये अमेरिकन ओपन (US Open) जिंकली होती.
सामन्यातील तिसर्या सेटमध्ये ०-३ अशी पिछाडी असताना रायबाकिना काहीशी निराश झालेली दिसत होती. मात्र तिच्या प्रशिक्षकांनी ‘ऊर्जा वाढव, सामना अजून संपलेला नाही,’ असा दिलेला सल्ला निर्णायक ठरला. २६ वर्षीय रायबाकिनाने अफलातून पुनरागमन करत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले. सामन्याच्या निर्णायक टप्प्यावर ‘टी’वर टाकलेल्या अचूक एससह तिने विजयावर शिक्कामोर्तब केले. रायबाकिनाने सलग पाच गेम जिंकत सामना आपल्या बाजूने वळवला. भेदक सर्व्हिसमुळे साबालेंका अडचणीत सापडली. प्रेक्षक थक्क झाले. एका छोट्याशा सल्ल्याने किती मोठा बदल घडू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरले. सध्या ५-३ अशी आघाडी घेत रायबाकिना विजयाच्या अत्यंत जवळ पोहोचली होती आणि अखेर तिने संधी साधत ऑस्ट्रेलियन ओपनवर आपलं नाव कोरलं.
सबालेन्काला सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी तिला मॅडिसन कीजकडून पराभूत व्हावे लागले होते. सबालेन्काने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तिने २०२३ आणि २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती, मात्र गेल्या दोन वर्षांपासून ती जेतेपदाच्या अगदी जवळ येऊन संधी गमावत आहे. ऑस्ट्रेलियन ओपन व्यतिरिक्त तिने २०२४ आणि २०२५ मध्ये अमेरिकन ओपनचे जेतेपदही पटकावले आहे.