आशिया चषक 2023 स्पर्धेच्या फायनलच्या दिवशी पाऊस पडला आणि पावसामुळे सामना वाया गेला, तर आशिया चषक ट्रॉफी कोणाला मिळणार? हा मोठा प्रश्न मनात नक्कीच निर्माण होत असेल, तर याबद्दल असणारे समीकरण जाणून घेऊया. हवामानाच्या अंदाजानुसार, 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, थांबून थांबून पाऊस होण्याची शक्यता आहे. 80 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून वारेही ताशी 18 किमी वेगाने वाहण्याची शक्यत आहे. अशा परिस्थितीत फायनलच्या दिवशी पाऊस पूर्णपणे अडथळा निर्माण करणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवसाचे आयोजन केले आहे.
17 सप्टेंबरला पावसामुळे सामना वाया गेला, तर दुसर्या दिवशी सामना खेळवला जाईल. म्हणजेच अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत 18 सप्टेंबरलाही पाऊस पडेल का? हा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. 18 सप्टेंबर म्हणजेच राखीव दिवशीही पावसाची शक्यता 69% आहे. अशा परिस्थितीत 17 आणि 18 तारखेला पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
1988 – भारत
1991 – भारत
1995 – भारत
1997 – श्रीलंका
2004 – श्रीलंका
2008 – श्रीलंका
2010 – भारत