स्पोर्ट्स

Asia Cup 2023 : आशिया चषक जिंकल्यानंतर भारताला मिळाले सव्वा कोटी रुपये

दिनेश चोरगे

कोलंबो; वृत्तसंस्था :  आशिया कप फायनलमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विक्रमी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया मालामाल बनलीच; परंतु फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही मालामाल झाला आहे. भारतीय संघाला अंदाजे 1.24 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याचवेळी, उपविजेत्या श्रीलंकेलादेखील अंदाजे 62 लाख रुपये मिळाले आहेत.

आशिया कप 2023 मध्ये कोणाला किती बक्षीस मिळाले?

रवींद्र जडेजा : 3000 डॉलर्स (2.49 लाख) सर्वोत्कृष्ट कॅच ऑफ द मॅच
मोहम्मद सिराज : 5000 डॉलर्स (रु. 4.15 लाख) आणि ट्रॉफी, सामनावीर
कुलदीप यादव : 50,000 डॉलर्स (रु. 41.54 लाख) स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू
श्रीलंका : उपविजेत्या संघाला 75,000 डॉलर्स (रु. 62.31 लाख)
भारत : विजेत्या संघाला 150,000 डॉलर्स (रु. 1.24 कोटी).

SCROLL FOR NEXT