पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडियाचा झालेला व्हार्टश वॉशने चाहते निराश झाले आहेत. आता शुक्रवार, ८ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या चार सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्त्वाखालील संघ टी-20 फॉरमॅटमधील आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीत सिंग याला नवा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. ( SA Vs IND T20I Series)
अर्शदीप संगला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची संधी आहे. तो भुवनेश्वर कुमारचा रेकॉर्ड मोडू शकतो. यावर्षी एकूण १४ टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने २८ बळी घेतले आहेत. त्याची या वर्षी सर्वोत्तम कामगिरी T20 विश्वचषकादरम्यान अमेरिका संघाविरुद्ध झाली होती. या सामन्यात त्याने चार षटकांत नऊ धावा देत चार विकेट घेतल्या होत्या. सध्या भारतासाठी पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमार याच्या नावावर आहे. भुवनेश्वरने एका कॅलेंडर वर्षात ३२ सामन्यांत ३७ विकेट घेतल्या आहेत. आता भुवनेश्वरचा विक्रम मोडण्यासाठी अर्शदीपला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत १० विकेट घ्याव्या लागणार आहेत.
अर्शदीपला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनण्याचीही संधी आहे. तो फिरकीपटू युजवेंद्र चहलला मागे टाकू शकतो, ज्याने सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ८० सामन्यांत ९६ बळी घेण्याचा विक्रम केला आहे. अर्शदीप सध्या हार्दिक पांड्यासोबत या यादीत चौथ्या स्थानावर आहे. अर्शदीपच्या नावावर ५६ टी-20 सामन्यांमध्ये ८७ बळी आहे. हार्दिकने १०५ सामन्यात ५६ विकेट घेतल्या आहेत. या यादीत भुवनेश्वर ८७ सामन्यात ९० विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे, तर टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ७० सामन्यांमध्ये ८९ बळी घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियात होणारी कसोटी मालिकेत खेळणार असल्याने बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघात नाही. अर्शदीपने 10 विकेट घेतल्याबरोबरच तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होणार आहे.
अर्शदीप सिंग याने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अर्शदीप टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा दीप्ती शर्मानंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज होण्याच्या जवळ आहे. अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 13 विकेट घेतल्या तर तो या फॉरमॅटमध्ये भारतासाठी 100 बळी पूर्ण करेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना ८ नोव्हेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. त्याचे पुढील तीन सामने 10, 13 आणि 15 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे.