अर्शदीपने मोडला बुमराह आणि भुवनेश्वरचा विक्रम Pudhari Photo
स्पोर्ट्स

Arshdeep Singh : टी-20 मध्ये अर्शदीप नवा 'विक्रमवीर'; जाणून घ्या काय केली कामगिरी..!

द. आफ्रिकेसोबत खेळलेल्या तिसऱ्या सामन्यात केला विक्रम

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे बुधवारी (दि.13) झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंगने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने या सामन्यात तीन बळी घेत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि भुवनेश्वर कुमार यांना मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे.

बुमराह, भुवनेश्वरला टाकले मागे

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर आहे. त्याने 80 सामन्यात 96 विकेट घेतल्या आहेत. या यादीत भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 87 सामन्यात 90 बळी घेतले आहेत. भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने 70 सामन्यांत 89 बळी घेतले आहेत. आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमुळे बुमराह सध्या द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळत नाही. सेंचुरियन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने रायन रिकेल्टनला बाद करून टी-20 मध्ये 90 बळी पूर्ण केले. आणि जसप्रीत बुमराहच्या (89) विकेट्सच्या संख्येला मागे टाकले.

चहलचा विक्रम निशाण्यावर

अर्शदीपने त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅनसेन यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन त्याने भुवनेश्वरला देखील पिछाडीवर सोडले. यासोबतच भारताने 11 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. त्याच्यानावे आता 92 विकेट्स आहेत आणि त्याला यादीत नंबर वन होण्यासाठी आणखी पाच विकेट्सची गरज आहे. युझवेंद्र चहलने 80 सामन्यांत 8.19 च्या इकॉनॉमी रेटने 96 विकेट्स घेतल्या आहेत.

T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:

  • युझवेंद्र चहल - 96

  • अर्शदीप सिंग - 92

  • भुवनेश्वर कुमार - 91

  • जसप्रीत बुमराह - 89

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT