IPL 2026 Andre Russell Retirement
कोलकाता : वेस्ट इंडिजचा T20 क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आंद्रे रसेल याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. या घोषणेमुळे या स्पर्धेतील त्याच्या १२ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीवर पडदा पडला आहे. २०२६ च्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावापूर्वी 'नाइट रायडर्स' संघाने त्याला मुक्त केले होते.
चेन्नई सुपर किंग्स सह इतर काही फ्रँचायझींसोबत त्याचे नाव जोडले जात होते. मात्र, रसेलने खेळाडू ऐवजी फ्रँचायझीमध्ये प्रशिक्षक म्हणून सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
'ड्रे रस' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूने आज कोलकाता नाइट रायडर्स ने शेअर केलेल्या एका अधिकृत व्हिडिओद्वारे ही घोषणा केली. तो अजूनही इतर जागतिक लीगमध्ये सक्रिय असला तरी, रसेलने याची पुष्टी केली की तो KKR मधून पूर्णपणे बाहेर पडणार नाही, तर तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत काम करेल.

आपल्या १२ IPL हंगामांपैकी ११ हंगामात KKR चे प्रतिनिधित्व करणाऱ्या रसेलने स्पष्ट केले की, सोशल मीडियावर दुसऱ्या संघाच्या जर्सीमध्ये फोटोशॉप केलेले स्वतःचे फोटो पाहून त्याला रात्री झोप लागत नव्हती. "जांभळ्या आणि सोनेरी रंगाशिवाय इतर कोणत्याही रंगात स्वतःला पाहणे मला विचित्र वाटत होते," असे त्याने सांगितले.