पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने 2024 मध्ये लिंग बदल केला. यानंतर अनाया बांगर म्हणून नवी ओळख स्वीकारली. यावेळी सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, सर्व टीकांना न जुमानता अनायाने आपली ओळख आणि भावना स्पष्टपणे मांडल्या आहेत. आता तिची आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझम याच्याशी जाेडले जात आहे. त्यांनी लग्नदेखील उरकल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आता या बद्दल अनायानेच तिची भूमिका सोशल मीडियावर शेअर केली आहे.
नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला की पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझमने फेब्रुवारी 2025 मध्ये अनाया बांगरसोबत लग्न केले आहे. या बातमीने क्रिकेट जगतात खळबळ उडवली आहे.
व्हायरल झालेल्या या अफवांवर प्रतिक्रिया देताना अनायाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे स्पष्टीकरण दिले. तिने व्हायरल पोस्ट अॅड करत लिहिले आहे की, " हे काय चाललंय हे? मी कन्फर्म करते की लग्न झालेलं नाही!" तिच्या या स्पष्ट उत्तरामुळे या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम मात्र शांत आहे. त्याने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. बाबर हा पाकिस्तानमधील सर्वाधिक चर्चेत असलेला बॅचलर असून, अनेक रिपोर्ट्सनुसार तो लवकरच विवाहबंधनात अडकू शकतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर त्याची सध्याची कामगिरी निराशाजनक असून, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याची बॅट शांत राहिली. पाकिस्तान संघाला यजमानपद असूनही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.