Amit Mishra On Virat Kohli: भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम ठोकून आता बराच काळ उलटला आहे. अमित मिश्रा हा भारतीय क्रिकेटमधील असा खेळाडू आहे ज्याने अनेकवेळा पुनरागमन केलं आहे. मात्र एकदा त्याला असं वाटलं होतं की आता आपण कधीच पुनरामन करू शकणार नाही. इंग्लंडमध्ये २०१७ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळला होता. त्यापूर्वी एक वर्ष आधी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला होता. त्यावेळी विराटने अमित मिश्राला एक आश्वासन दिलं होतं. मात्र ते आश्वासन त्याने पाळलं नाही असा दावा अमित मिश्राने केला आहे.
अमित मिश्राने विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यावर आरोप केले आहेत. आकाश चोप्रासोबत पॉकास्टमध्ये बोलताना त्याने हे आरोप केले आहेत. अमित मिश्रा म्हणतो की अनिल कुंबळे आणि विराट कोहली या दोघांनीही मला आश्वासन दिलं होतं. ते काही पाळलं गेलं नाही अन् बंगळुरूमधील इंग्लंडविरूद्धचा सामना माझ्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना ठरला आहे.
अमित मिश्रा पॉडकास्टमध्ये म्हणाला, 'बंगळुरूच्या सामन्यावेळी माझ्या पायाला दुखापत झाली होती. मी दुखापतग्रस्त होऊन जात होतो. त्यावेळी अनिल कुंबळे प्रशिक्षक होता. मी अनिल भाईला विचारले. त्यावेळी ते म्हणाले की काळजी करू नकोस तू फिट होऊन ये. तू आपोआपच संघात येशील.'
त्यानंतर विराट कोहली संघाचा कर्णधार झाला. मी विराट कोहलीला देखील विचारले. काय करायलं हवं असं मी त्याला विचारलं होतं. त्यावेळी त्याने तू चिंता करू नकोस पूर्णपणे फिट हो, कम्फर्टेबल हो. तू संघात आहेस.
त्यानंतर अमित मिश्रा हा दुखापतीतून सावरला अन् त्यानंतर त्याने विराट कोहलाला फोन केले. मेसेज केले मात्र विराटने त्याचे काही उत्तरच दिलेले नाही.
मिश्रा पुढे म्हणाला की, यानंतर मी विराट कोहलीकडे गेलो अन् विचारलं भाई काय परिस्थिती आहे. त्यावेळी त्याने एक आठवडा ते दहा दिवसात याबाबत सांगतो असं सांगितलं. एक आठवडा झाला, दोन आठवडे झाले, तीन आठवडे झाले त्याच्याकडून काही अपडेट नाही. मी देखील त्याला फोन केला मात्र त्याने उचलला नाही. मेसेज केला मात्र काही रिप्लाय नाही.'
अमित मिश्राने सांगितलं की त्याच्यापेक्षा जास्त काळ बाहेर असलेले खेळाडू संघात पुन्हा आले. मात्र मला घेण्यात आलं नाही.
दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी प्रशिक्षक झालेल्या अमित मिश्राने सांगितलं की, 'मी अनेकवेळा कॉल मेसेज केले. उत्तर आलं नाही म्हटल्यावर मी देखील जाऊ दे म्हणालो आणि सोडून दिलं. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही नको आहात तर तुम्ही काय करू शकता. ज्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त दुखापतग्रस्त झालेले खेळाडू खूप काळ दुखापतग्रस्त राहिलेले खेळाडू त्यांचे पुनरागमन होते. तरी मला कोणता मेसेजच येत नाही. त्यावेळी तुम्ही काय करू शकता?