बॉक्सर इमान खलिफ File Photo
स्पोर्ट्स

ऑलिम्पिक पदक जिंकणारी महिला बॉक्सर निघाली पुरुष! मेडिकल रिपोर्टमधून खुलासा

इमान खलिफमध्ये अंडकोष आणि XY गुणसूत्र

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Boxer Imane Khelif : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियासाठी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी बॉक्सर इमान खलिफबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ही बॉक्सर महिला नसून पुरुष असल्याचे सिद्ध झाले आहे. रिपोर्टनुसार, इमान खलीफाचे शरीर हे पुरषांसारखे आहे. इमान खलिफमध्ये पुरुषांमध्ये आढळणारे अंतर्गत अंडकोष आणि XY गुणसूत्र आहेत. इमानचे वैद्यकीय अहवाल 5-अल्फा रिडक्टेस विकाराकडे निर्देश करतात, असेही नमूद केले आहे. पॅरिसमधील क्रेमलिन-बिसेट्रे रुग्णालय आणि अल्जियर्समधील मोहम्मद लमाइन डेबघिन रुग्णालयातील तज्ञांनी 2023 च्या अहवालात अनेक खुलासे केले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला बॉक्सिंगमध्ये इमानने इटलीच्या बॉक्सरला फक्त 46 सेकंदात पराभूत केले होते. त्यामुळे तिच्यावर पुरुष असल्याचा आरोप झाला होता. असे असूनही तिने ही स्पर्धा पूर्ण केली आणि सुवर्ण पदकही पटकावले होते. अनेक महिला बॉक्सर्सनी इमान खलिफ पुरुष असल्याचा आरोप केला होता. मेडिकल रिपोर्टनुसार इमान खलिफवर काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इमान खलिफावर कारवाई होण्याची ही काही पहिली वेळ नाही. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी गेल्या वर्षी जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. इमान खलिफबाबत एक रिपोर्ट लीक झाला असून हा रिपोर्ट जून 2023 चा आहे. हा रिपोर्ट पॅरिसच्या क्रेमलिन-बिसेत्रे रुग्णालय आणि अल्झियर्सच्या मोहम्मद लॅमिन डेबाघिन रुग्णालच्याच्या तज्ज्ञांनी तयार केला आहे. हा रिपोर्ट फ्रांसच्या एका पत्रकाराने लीक केला आहे.

लिंग वादावर खलीफने काय म्हटले?

लिंग विवादावर इमान खलीफेने यापूर्वी म्हटले होते की, ‘मी इतर महिलांप्रमाणेच एक स्त्री आहे. मी स्त्री म्हणून जन्माला आले, मी स्त्रीप्रमाणे जगते आणि मी पात्र आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT