T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली आहे. सुपर ८ मधूनच त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला असून पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून त्यांना सपाटून मार खावा लागला. यानंतर पाकिस्तानी संघावर टीका होत आहे. पीसीबी तर थेट खाळाडूंवर आर्थिक दंड आकाराला आहे.
यादरम्यान, पाकिस्तान निवडसमिती सदस्य आणि माजी पंच अलीम दार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देता देता आपण प्रशिक्षक माईक हेसन यांच्यावर नाराज असून त्यांना टी २० वर्ल्डकपचा संघ निवडण्याची पूर्ण जबाबदारी देण्यात आल्याचा दावा केला.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ सुपर ८ मध्येच गाद झाला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये रोज एक भूकंप येत आहेत. एका वृत्तानुसार निवडसमिती सदस्य अलीम दा हे कोच माईक हेसन यांच्यावर नाराज असून संघ निवडीची सर्व सूत्रे त्यांच्या हातात दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळं त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबतचं आपलं असोसिएशन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 'सूत्रांनी दावा केला आहे की अलीम दार यांचा राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं असून स्विकारलेला नाही. ते असाद शफीक आणि आकिब जावेद यांच्या निवडसमितीतील एक सदस्य आहेत. सूत्रांनी सांगितलं की माजी पंच असलेले अलीम दार हे टी २० वर्ल्डकप २०२६ साठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तानी संघावर नाखूष आहेत. त्यांनी या टी २० संघात बाबर आझम, शादाब खान यांना निवडण्यास विरोध केला होता. मात्र हेसन यांना हे दोन खेळाडू संघात हवे होते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 'अलीम हे पाकिस्तानच्या टी २० वर्ल्डकप संघावर खूप नाराज होते. त्यांनी बाबर आझम आणि शादाब खान यांना संघात घेण्यास विरोध केला होता. त्यांची कामगिरी निवड करण्यायोग्य नव्हती असं त्यांचे मत होतं. मात्र प्रशिक्षक हेसन यांना मात्र ते संघात हवे होते.'
बाबरसाठी टी २० वर्ल्डकप २०२६ फारसा चांगला गेलेला नाही. तो आपल्या लौकिसास साजेसा खेळ करू शकला नाही. त्याच्या अपयाशमुळं पाकिस्तानी बॅटिंग लाईन अपवर मोठा दबाव आला होता. त्याला टी २० वर्ल्डकपमध्ये ५ सामन्यात फक्त ९० धावाच करता आल्या आहेत. त्यानं यंदाच्या स्पर्धेत सर्वोच्च ४६ धावांची खेळी केली. आझम याला काही सामन्यात फलंदाजी मिळाली नाही. त्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोट करण्यात आलं होतं. हेसन यांनी स्वतःहून बाबरचा यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये स्ट्राईक रेट चांगला नव्हता असं मान्य केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अलीम दा यांनी बाबर अन् शादाब यांच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी जर सुमार कामगिरी असलेल्या खेळाडूंनाच निवडायचं होतं तर रिझवानला का निवडलं नाही अशी देखील विचारणा केली. मात्र त्यांना कोणी पाठिंबा दिला नाही असं देखील सूत्रांकडून समजतंय.