अजिंक्य रहाणे कौंटी वनडे चषक खेळण्यासाठी इंग्लडमध्ये दाखल झाला आहे.  Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Ajinkya Rahane : दिसणार नव्या क्रिकेट संघासोबत

इंग्लडच्या कौंटी वनडे चषकात तळपणार रहाणेची बॅट

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला फलंदाज अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे. रहाणे क्रिकेट खेळण्यासाठी आता इंग्लंडमध्ये गेला आहे. तो इंग्लंडच्या देशांतर्गत कौंटी वनडे चषकात खेळताना दिसणार आहे. रहाणे या स्पर्धेत उत्तरार्धात खेळणार आहे. राष्ट्रीय कर्तव्यामुळे खेळू न शकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची जागा भारतीय संघाचा माजी कर्णधार घेणार आहे.

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे सातत्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. रहाणेने टीम इंडियासाठी शेवटचा सामना वेस्ट इंडिजमध्ये गतवर्षी कसोटी सामन्यात खेळला होता. मात्र तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. दरम्यान, रहाणेने मोठा निर्णय घेतला असून नव्या संघासोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असताना रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार होता. 2020-21 मध्ये, जेव्हा विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळून परतला तेव्हा रहाणेने संघाचे नेतृत्व केले आणि संघाला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला होता.

या संघामध्ये दिसणार रहाणे

रहाणे आता इंग्लंडच्या कौंटी लिसेस्टरशायरमध्ये सामील झाला आहे. तो या संघाकडून खेळताना दिसणार आहे. रहाणे कौंटीसाठी एकदिवसीय चषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. सध्या एकदिवसीय चषक सुरू आहे. रहाणे या स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळणार आहे. रहाणे शेवटच्या पाच सामन्यांमध्ये संघाचा भाग असणार आहे. विआन मुल्डरच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मुल्डर ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका संघासोबत वेस्ट इंडिजला जाणार आहे. लीसेस्टरशायर फॉक्स हे या स्पर्धेचे सध्याचे चॅम्पियन आहेत.

अशी आहे रहाणेची कारकीर्द

अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 188 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 45.76 च्या सरासरीने 13,225 धावा केल्या आहेत. रहाणेच्या नावावर 54 अर्धशतके आणि 39 शतके आहेत. रहाणेने लिस्ट-ए मध्ये 182 सामने खेळले असून 39.72 च्या सरासरीने 6475 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 10 शतके आणि 45 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले असून 38.46 च्या सरासरीने 5077 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत. रहाणेने भारतासाठी 90 एकदिवसीय सामने खेळले असून 2962 धावा केल्या आहेत. त्याने 20 टी-20 सामन्यात 375 धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT