T20 World Cup 2026 Afghanistan cricket team  pudhari photo
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: द. अफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या संघातील सदस्याला आला हार्ट अटॅक; रूग्णालयात केलं होतं दाखल

Afghanistan Team Staff Member Heart Attack: दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा सामना हा खेळाडूंसाठी शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या खूप उतार चढावांचा राहिला होता.

Anirudha Sankpal

T20 World Cup 2026: भारतात सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेसोबतचे आपले सामने गमवाले असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. यंदाचा टी २० वर्ल्डकप जायंट किलर अफगाणिस्तानसाठी फारसा चांगला गेलेला नाही. त्यातच आता त्यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यानंतर खेळाडू आणि स्टाफ हा प्रचंड शारीरिक आणि मानसिक उतार चढावातून गेला होता. त्यातच अफगाणिस्तानचे कामगिरी विश्लेषक केसी रामा सुब्रमण्यम यांना माईल्ड हार्ट अटॅक आला आहे. नवी दिल्लीत असताना हा हार्ट अटॅक आला.

मुंबई मिररनं दिलेल्या बातमीनुसार, 'सुब्रमन्यम यांना बुधवारी छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांना फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली. ते सध्या धोक्याच्या बाहेर आहेत.

सूत्रांनी मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, 'अफगाणिस्तान संघातील कामगिरी विश्लेषक छातीत दुखत होतं. त्यांना कमी तीव्रतेचा ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यांना फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आहे. आता ते धोक्याच्या बाहेर असून त्यांना बरं वाटत आहे.'

सुब्रमण्यम हे मुळचे चेन्नईचे आहेत. ते अफगाणिस्तान संघातील एक आदरणीय व्यक्ती आहेत. त्यांनी स्पोर्टालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक म्हणून देखील काम केलं आहे.

सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचं स्वप्न भंगलं

टी २० क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात धमाकेदार आणि दर्जेदार सामना म्हणून दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याकडे पहावं लागेल. डबल सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात दक्षिणअफ्रिकेनं अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला होता. यावेळी गुरबाज हा शेवटपर्यंत भिडला होता.

त्यापूर्वी अफगाणिस्तानला न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात ५ विकेट्सनी हार सहन करावी लागली होती. चेन्नईत झालेल्या या सामन्यातील पराभवानंतर ग्रुप D मधील अफगाणिस्तान स्पर्धेतून जवळपास बाहेर गेला आहे हे निश्चित झालं आहे. आता ते १६ फेब्रुवारी रोजी आपला तिसरा सामना युएई विरूद्ध नवी दिल्लीत खेळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT