FIFA World Cup 2026 Ball Pudhari.
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 : 'मैदानात धावणार 'हा' खास चेंडू !'

हा चेंडू केवळ डिझाईनच्या दृष्टीने नाही, तर तंत्रज्ञान आणि प्रतीकात्मकतेच्या दृष्टीनेही विशेष मानला जातो.

पुढारी वृत्तसेवा

विवेक कुलकर्णी

प्रत्येक वर्ल्ड कपसाठी अदिदास कंपनी एक विशेष हाय-टेक चेंडू बनवते, ज्यामध्ये चिप्स आणि सेन्सर्स बसवलेले असतात. यंदाच्या २०२६ फिफा विश्वचषकासाठी अधिकृत सामना चेंडू म्हणून अदिदास ट्रायोंडा हा चेंडू तयार करण्यात आला आहे. हा चेंडू केवळ डिझाईनच्या दृष्टीने नाही, तर तंत्रज्ञान आणि प्रतीकात्मकतेच्या दृष्टीनेही विशेष मानला जातो.

चेंडूची प्रमुख वैशिष्ट्ये

१. तीन यजमान देशांचे प्रतीकात्मक डिझाईन

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन यजमान देशांचे प्रतिनिधित्व करणारे रंग आणि ग्राफिक्स यात वापरण्यात आले आहेत. 'Tri' म्हणजे तीन आणि 'Onda' म्हणजे लाट म्हणजेच तीन देशांची एकत्रित लाट अशी संकल्पना यात दिसते.

२. प्रगत 'कनेक्टेड बॉल टेक्नॉलॉजी

या चेंडूच्या आतमध्ये सेन्सर बसवलेला आहे, जो चेंडूच्या हालवाली, वेग आणि स्पर्श यांची अत्यंत अचूक माहिती रिअल टाईममध्ये VAR प्रणालीला पाठवतो. यामुळे ऑफसाईड निर्णय आणि फाऊल निर्णय अधिक अचूक होतात.

३. सुधारित एरोडायनॅमिक्स

चेंडूची रचना अशा प्रकारे केली आहे की, हवेत त्याची स्थिरता वाढते. लांच पासेस आणि जोरदार शॉटस्दम्यान त्याची दिशा अधिक नियंत्रित राहते.

४. चार पॅनेल्सची नवी रचना

पूर्वीच्या अनेक चेंडूंमध्ये ६-८ पॅनेल्स असायचे, या मोडलमध्ये कमी पॅनेल्स वापरून चेंडूला अधिक वेगवान आणि संतुलित बनवले आहे.

५. रात्रीच्या सामन्यांसाठी विशेष व्हिजिबिलिटी

स्टेडियम लाईटस्मध्ये चेंडू अधिक स्पष्ट दिसावा, यासाठी उच्च कॉन्ट्रास्ट रंगसंगती वापरण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT