Abhishek Sharma Breaks Suryakumar Yadav Record : अभिषेक शर्माने आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या ४९ धावांच्या खेळीदरम्यान सूर्यकुमार यादवचे दोन मोठे विक्रम मोडीत काढले. तो आता भारताकडून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये १,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने उत्कृष्ट फलंदाजी करत २० चेंडूंमध्ये २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. अभिषेक या सामन्यात भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला. त्याने खेळपट्टीवर चांगला संघर्ष केला, मात्र तो भारताला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही. या खेळीदरम्यान अभिषेकने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या १,००० धावा पूर्ण केल्या आणि सूर्यकुमार यादवला मागे टाकले.
अभिषेक शर्माने ४९ धावांच्या या खेळीदरम्यान टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या १,००० धावांचा टप्पा पार केला. आता तो भारताकडून टी२०आय मध्ये सर्वात कमी चेंडूत १,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. अभिषेक शर्माने टी२०आय मधील आपल्या १,००० धावा अवघ्या ५२८ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. सूर्यकुमार यादवने ही कामगिरी ५७३ चेंडूंमध्ये केली होती. . या यादीत शिवम दुबे तिसऱ्या, तर संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.
अभिषेक शर्मा (५२८ ), सूर्यकुमार यादव (५७३ ), शिवम दुबे (६४८ ), संजू सॅमसन / हार्दिक पंड्या (६७९)
अभिषेकने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २ षटकार ठोकले. यासह तो टी२०आय मध्ये ४६ डावांनंतर (Innings) सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत थेट 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलसोबत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. षटकार ठोकण्यातही अभिषेकने सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. सूर्यकुमारने T2OIमध्ये ४६ डावांनंतर एकूण ९६ षटकार मारले होते. या यादीत इव्हिन लुईस पहिल्या क्रमांकावर असून त्याने ४६ डावांनंतर एकूण ११० षटकार ठोकले होते.
इव्हिन लुईस : ११० षटकार
अभिषेक शर्मा / ख्रिस गेल : ९८ षटकार
सूर्यकुमार यादव : ९६ षटकार
कॉलिन मुनरो : ८४ षटकार