Cricke Viral Video News
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात क्रिकेट खेळ लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत लोकप्रिय आहे. लहान मुलांना आपणही सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सारखे खेळावे, असे वाटते. त्यासाठी लहानपणापासूनच मुले बॅट आणि बॉलने सराव करायला सुरुवात करतात. असाच एका तीन वर्षांच्या मुलाचा क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचे शॉट्स पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. तो उंच षटकार आणि लांब चौकार मारताना दिसत आहे. या मुलांवर कमेंटचा वर्षाव होऊ लागला असून त्याचे कौतुक केले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये अवघ्या ३ वर्षांच्या मुलाने यॉर्कर चेंडूंवर जबरदस्त फटके मारले आहेत. कोहली आणि धोनीदेखील त्याच्या खेळाचे कौतुक करतील, असे म्हटले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो कव्हर ड्राईव आणि धोनीच्या ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉटला उत्तम दर्जाने मारताना दिसत आहे. यॉर्कर चेंडूंवर असे फटके मारणे हे काही मुलांना शक्य नाही, पण या मुलाने ते स्वतः खेळून दाखविले आहे. ते पाहिल्यानंतर युजर्स त्याच्या फलंदाजीचे कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये, मुलाला टाकलेला पहिला चेंडू यॉर्करसारखा आहे. तो त्याच्या ऑन साईडला मारतो. आणि चेंडू आकाशाकडे उडतो. मग पुढच्या चेंडूवर तो यॉर्करसारखा मारायला जातो. पण तो एका उत्कृष्ट कव्हर ड्राइव्ह शॉट होतो.
गोलंदाज तिसरा आणि चौथा दोन्ही चेंडू लक्ष्याच्या अगदी मुळाशी टाकतो, पण त्यावरही तो मुलगा त्याची बॅट पूर्णपणे फिरवतो. आणि हेलिकॉप्टर शॉट खेळतो. आणि चेंडू हवेत उडवतो. मुलाच्या खेळाची ही सुमारे १० सेकंदांची छोटी क्लिप असून यावर आता युजर्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
कमेंट सेक्शनमध्ये काही युजर्स लहान मुलाच्या फलंदाजीचे कौतुक करताना दिसत आहेत. एका युजर्सने लिहिले आहे की, त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर, राजस्थान रॉयल्सने त्याला आतापर्यंत ९९ मिस्ड कॉल दिले असतील.
दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, चेन्नई सुपर किंग्जसाठी पुढचा थाला. तिसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, भाऊ ३ वर्षांच्या वयात हेलिकॉप्टर, कव्हर ड्राइव्ह, स्लॉग स्वीप खेळतो. अद्भुत! चौथ्या युजर्सने म्हटले आहे की, त्याचे भविष्य उत्तम असणार आहे.