Latest

‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित दसरा- दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या शहरातील अनेक शोरूमचे स्टॉल्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून शोरूम्सच्या वतीने या प्रदर्शनासाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

'पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2023'चा शनिवारी दुसरा दिवस होता. राजारामपुरी कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह परिसरात प्रदर्शनाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 9 या वेळेत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे. रॉनिक स्मार्ट वॉटर हीटर आणि जय किसान शक्ती आटा चक्की या फेस्टिव्हलचे सहप्रायोजकआहेत.

वाहनांवर आकर्षक ऑफर्स

फेस्टिव्हलमध्ये शहरातील प्रमुख दुचाकी आणि चारचाकीच्या (कार) शोरूमचे स्टॉल्स उभारण्यात आले असून एकाच ठिकाणी विविध पर्याय पाहण्याची आणि जाणून घेण्याची संधी ग्राहक घेत आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी विविध शोरूम्सनी खास ऑफर्स घोषित केल्या आहेत.

युनिक अ‍ॅटोमोबाईल्सतर्फे कारच्या विविध मॉडेल्सवर 10 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत खास दसरा ऑफर देण्यात आली आहे. युनिक हिरोतर्फे विडा या इलेक्ट्रिक स्कूटरवर 30 हजार रुपयांपर्यंतची सवलत दिली असून एक्स्चेंजसाठी 10 हजार रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस ठेवला आहे. ट्रायम्फ या 400 सीसीच्या मोटारसायकलवर 10 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट उपलब्ध आहे. एथरच्या 450 एस मॉडेलवर आकर्षक कॅशबॅक मिळत आहेत.

माई ह्युंदाईने सर्व सीएनजी मॉडेल्सवर खास ऑफर ठेवली असून कारच्या सुरक्षा साधनांवर विशेष भर देण्यात आला आहे. माई टीव्हीएस मध्ये सरकारी कर्मचार्‍यांना पेट्रोल वाहनांवर विशेष सवलत ठेवली आहे.

काले बजाजतर्फे चेतक इव्ही या दुचाकीसोबत आकर्षक किमतीचे गार्डस् फ्री देण्याची ऑफर ठेवली आहे. इतरही अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

साई सर्व्हिसतर्फे फेस्टिव्हल काळात बूक होणार्‍या आणि हजर स्टॉक मध्ये उपलब्ध असलेल्या वाहनांवर 100 लिटर पेट्रोलची ऑफर ठेवली आहे. कारच्या विविध मॉडेल्सवर 30 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत सवलत आहे.

एमजीने हेक्टरवर भरघोस अशी अ‍ॅनिव्हर्सरी ऑफर दिली आहे. शिवाय झेडएसइव्हीवरदेखील अविश्वसनीय ऑफर देण्यात आली आहे. एमजीने ग्राहकांना एक्स्चेंज बोनस दिला असून दसरा बुकिंगसाठी फ्री इन्शुरन्सची सुविधा देण्यात आली आहे.

होंडा कारने अमेझ या मॉडेलवर पाच वर्षे अनलिमिटेड किलोमीटरसाठी एक्स्टेंडेड वॉरंटी आणि फ्री मेन्टेनन्सची ऑफर ग्राहकांना दिली आहे. इलाइट मॉडेलमध्ये ग्राहकांसाठी अधिकच्या अ‍ॅक्सेसरीज देण्यात आल्या आहेत.

गृहोपयोगी दालनामध्ये गृहिणींची तुडुंब गर्दी

दसरा, दिवाळी म्हटले की, खरेदी आलीच. घरात नवीन कपडे, घर सजावटीच्या वस्तू, वाहने खरेदी करण्यासाठी दसर्‍याचा मुहूर्त निवडतात. विकेंडमुळे गृहिणींनी गृहोपयोगी वस्तूंच्या दालनात तुडुंब गर्दी केली होती.

होम अप्लायन्सेस, गारमेंट, होम डेकोर, ज्वेलरी, मसाले, बेकरी उत्पादने, आयुर्वेदिक प्रॉडक्ट या फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत.
फर्निचर, आटा चक्की, रोटी मेकर्स, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, कपडे, चहा व मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, शूज, ज्वेलरी, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी ड्रेस, ड्रेस मटेरियल, सजावटीच्या वस्तू, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे शंभरांहून अधिक स्टॉल फेस्टिव्हलमध्ये गर्दी खेचत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT