Latest

शाब्बास रे पठ्ठ्या! विराटच्या शॉटवर ‘गांगुली दादा’ घायाळ! रिॲक्शन झाली व्हायरल! (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने लखनौ सुपर जायंट्सवर 14 धावांनी रोमांचक विजय मिळवला. आरसीबीने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना लखनौ संघाने सामन्यात रंगत आणली. पण अखेर आरसीबीच्या गोलंदाजांनी लखनौला रोखण्यात यश मिळवले. दरम्यान, या सामन्यात फलंदाजांनी अनेक मोठे फटके तर गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. मात्र, आरसीबीचा स्टार विराट कोहलीच्या एका अप्रतिम फटक्यावर खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुलीही फिदा झाले आणि त्यांनी टाळ्या वाजवत कौतुक केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (sourav ganguly impressed on virat kohli's classic shot)

सामन्याच्या दुस-या षटकात दुष्मंथा चमीराने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीने आपल्या क्लासिक फटक्याचे प्रदर्शन करत चेंडू सीमापार पोहचवला. कोहलीने त्याच्या मनगटाचा वापर करून ओव्हर पिच केलेला चेंडू मिड-ऑनमध्ये ड्राईव्ह केला त्याला चौकारासाठी पाठवले.

क्लासिक शॉट्स खेळणे ही विराटची खासियत आहे. अनेक दिग्गज त्याच्या या खेळीसमोर नतमस्तक होता. अशा क्लासिक शॉट्सच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये विराटने त्याचा दबदबा निर्माण केला आहे. काल ईडन गार्डन मैदानावर खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यातही त्याचा क्लासिक शॉट्स पहायला मिळाला. कोहलीने पूर्ण फुल लेन्थ चेंडूवर कसलीही चूक न करता शानदार ड्राईव्ह लगावला आणि चेंडू सीमारेषेच्या पल्याड पाठवला. हे पाहून स्टँडमध्ये बसलेले भारतीय क्रिकेटचे 'दादा' आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह सचिव जय शाह चांगलेच प्रभावित झालेले दिसले. (sourav ganguly impressed on virat kohli's classic shot)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT