पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचानक प्रकृती बिघडल्याने गुरुवार, दि. २ मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Sonia Gandhi Health Update) त्यांना ताप आला असून त्यांच्या विविध चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. (Sonia Gandhi Health Update)
सोनिया गांधी यांना ताप आल्यामुळे २ मार्चला 'चेस्ट मेडिसीन' विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुप बसु आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले. बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'सोनिया गांधी यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली तपास सुरु आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.'
राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांची तब्येत बिघडलीय. राहुल गांधी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यानासाठी गेले आहेत. सोनिया गांधी यांची तब्येत याआधीही खराब झाली होती. कोविडनंतर त्या रुग्णालयात झाल्या होत्या.
सर गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डी एस राणा म्हणाले, २ मार्चपासून सोनिया गांधी यांच्यावर चेस्ट मेडिसिन विभागाचे सीनिअर कन्स्लटेंट डॉ. अरुप बसु यांच्या देखरेखीखाली नेतृत्व सुरु आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे.