पुढारी ऑनलाईन डेस्क
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे, असे वृत्त 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिले आहे. सोनिया गांधी यांना बुधवारी सायंकाळी हलका ताप आला. त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मागील आठवड्यात सोनिया गांधी यांच्या भेटीला अनेक नेते आणि कार्यकर्ते आले होते. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असे काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांना म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच त्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या नेते आणि कार्यकर्ते यांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, ८ जून रोजी सक्तवसुली संचालनालय (ईडी) नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे. या दिवशी त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.